शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कोल्हापूर : चिदंबरम यांच्या उपस्थितीत ‘डी. वाय.पाटील विद्यापीठा’चा शनिवारी दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:57 IST

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २०) होणार आहे. कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात शाहू छत्रपती यांना सन्माननीय ‘डी. लिट.’ आणि डॉ. अरूण कुमार अगरवाल यांना ‘डी.एस्सी. पदवी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

ठळक मुद्देसंजय डी. पाटील यांची माहिती; शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’ अरुणकुमार अगरवाल यांना ‘डी. एस्सी.’धर्मादाय आयुक्तांकडून कौतुक, एकूण २३० विद्यार्थ्यांना पदवी

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २०) होणार आहे. कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात शाहू छत्रपती यांना सन्माननीय ‘डी. लिट.’ आणि डॉ. अरूण कुमार अगरवाल यांना ‘डी.एस्सी. पदवी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

शाहू छत्रपती यांना सन्माननीय ‘डी. लिट.’

कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि कुलगुरू डॉ. प्रकाश बी. बेहेरे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.ट्रस्टचे अध्यक्ष संजय डी. पाटील म्हणाले, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात शाहू छत्रपती यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या कार्याच्या सन्मार्थ विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट. पदवी प्रदान केली जाणार आहे. ‘डी.एस्सी.’ पदवीने सन्मानीत केले जाणारे डॉ. अरूण कुमार अगरवाल हे नवी दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता आहेत.

मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता अरूण कुमार अगरवाल 

सध्या ते अपोलो हॉस्पिटलमध्ये नवोपक्रम, शिक्षण आणि क्लीनीकल एक्सलन्सचे वैद्यकीय सल्लागारपदी कार्यरत आहेत. त्यांनी आयुर्विज्ञान क्षेत्रात संशोधन केले आहे. कुलगुरू डॉ. बहेरे म्हणाले, विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यापीठाला नॅकचे सलग दुसऱ्यांदा ‘ए’ मानांकन मिळाले.

विद्यापीठाला उत्कृष्ट तांत्रिकता पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडिया टुडे व नेल्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे पश्चिम विभागात तिसरे आणि राष्ट्रीयस्तरावर १५ वे उत्कृष्ट कॉलेज ठरले. पीएच.डी. प्राप्त केलेले विद्यार्थी विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईश्वरी कुलकर्णी, लखन खुराणा यांना जागतिक बायोएथीक्स दिवसानिमित्त आयोजित केलेल्या लघुचित्रफीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. या पत्रकार परिषदेस विद्यापीठाचे वित्त अधिकारी शाम कोले, प्रभारी अधिष्ठाता डॉ. आशालता पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अरूण पोवार, प्रा. महादेव नरके, आदी उपस्थित होते.

धर्मादाय आयुक्तांकडून कौतुकवैद्यकीय व परिचारीका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरीब, गरजू रूग्णांना मोफत सेवा दिली जाते. गावे दत्तक घेतली आहेत. त्याचे कौतुक धर्मादाय आयुक्तांनी कौतुक केले असल्याचे अध्यक्ष संजय. डी. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त अद्यावत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

एकूण २३० विद्यार्थ्यांना पदवीयावर्षीच्या दीक्षान्त समारंभात पीएच.डी. सह एकूण २३० विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी, तर बी. शिवरंजनी, ऐश्वर्या कल्याणी, मुबिना फणीबंद, राहूल पाटील, निकुंज शेखदा, कल्याणी कुलकर्णी, डॉ. अभिनव राऊत यांना सुवर्णपदक प्रदान केले जाणार असल्याचे कुलसचिव भोसले यांनी सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरParliamentसंसद