शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राज्य सहकारी संघात प्रताप पाटील, तिडके, कुसाळकरांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 20:03 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र  राज्य सहकारी संघा च्या निवडणुकीत संघाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, माजी आमदार सुहास तिडके व मजूर फेडरेशनचे अध्यक्ष संजय कुसाळकर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय ‘परिवर्तन पॅनेल’ने बाजी मारली. विरोधी भाजपपुरस्कृत ‘सहकार पॅनेल’चा धुव्वा उडवत २१ पैकी २० जागा जिंकत संघाची सूत्रे आपल्या ताब्यात ठेवली. भाजपच्या पॅनेलचे नेतृत्व ...

ठळक मुद्देराज्य सहकारी संघात प्रताप पाटील, तिडके, कुसाळकरांची बाजी२१ पैकी २० जागांवर विजय : भाजपच्या दरेकर पॅनेलचा धुव्वा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत संघाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, माजी आमदार सुहास तिडके व मजूर फेडरेशनचे अध्यक्ष संजय कुसाळकर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय ‘परिवर्तन पॅनेल’ने बाजी मारली. विरोधी भाजपपुरस्कृत ‘सहकार पॅनेल’चा धुव्वा उडवत २१ पैकी २० जागा जिंकत संघाची सूत्रे आपल्या ताब्यात ठेवली. भाजपच्या पॅनेलचे नेतृत्व आमदार प्रविण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी केले.कोल्हापुरातून मुकुंद पोवार यांना संधी मिळाली.संघाच्या २१ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १४ जागांसाठी रविवारी (दि. ४) राज्यातील तेरा केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण २३५७ पैकी १८६७ (७९ टक्के) मतदान झाले. संघाच्या पुणे येथील कार्यालयात मंगळवारी मतमोजणी करण्यात आली.

त्यामध्ये डॉ. प्रताप पाटील, सुहास तिडके व संजय कुसाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘परिवर्तन पॅनेल’ने १४ पैकी १३ जागा सरासरी ५८० मताधिक्क्याच्या फरकाने जिंकत संघावर वर्चस्व प्रस्थापित केले.

विरोधी ‘सहकार पॅनेल’चे सुभाष आकरे (अहमदनगर) हे एकमेव संचालक म्हणून निवडून आले. मागील संचालक मंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील अ‍ॅड. अशोकराव साळोखे व विजय पोळ प्रतिनिधीत्व करत होते. आता मुकुंद पोवार यांना संधी मिळाली आहे.

मुंबईचे वर्चस्व कमीसंघाच्या मागील निवडणुकीत मुंबई विभागाचे वर्चस्व राहिले. त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती/जमाती गटातून रामदास मोरे हे एकमेव विजयी झाले; तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पाच संचालकांना संधी मिळाली. पूर्वीच्या ५२ लोकांच्या संचालक मंडळात पाचजण होते पण आता २१ जणांमध्ये पाच जणांना संधी मिळाली हे विशेष आहे.

बिनविरोध संचालक असे -हिरामल सातकर (पुणे), डॉ. प्रताप पाटील (कोल्हापूर), गुलाब मगर (औरंगाबाद), अ‍ॅड. सुहास तिडके (विदर्भ), महादेवराव सोनवणे (राज्यस्तरीय संस्था), बी. डी. पारले (मुबंई), रामकृष्ण बांगर (बीड).

निवडून आलेले संचालक असे-भाऊसाहेब कुराडे (कोकण), पांडुरंग सोले-पाटील (नाशिक), एन. एम. हुल्लाळकर (विभागीय स्तरीय संस्था), सुभाष आकरे (अहमदनगर).सर्वसाधारण गट - संजय कुसाळकर (पुणे), चंद्रकांत जाधव (सातारा), सुनील ताटे (सांगली), मुकुंद पोवार (कोल्हापूर), विलास महाजन (यवतमाळ).राखीव गट - अनुसूचित जाती/जमाती- सिद्धार्थ पठाडे (चंद्रपूर), भटक्या विमुक्त जाती/जमाती- रामदास मोरे (मुंबई), इतर मागासप्रवर्ग- अर्जुनराव बोरुडे (अहमदनगर), महिला प्रतिनिधी- विद्याताई पाटील (लातूर), सुनीता माळी (धुळे).

सहकारातील शिखरसंस्थेच्या सभासदांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्यास पात्र राहून यापुढे आदर्शवत कारभार करून दाखवू. सहकार रोज बदलत असून त्यानुसार संस्थांना प्रशिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहे.- डॉ. प्रताप पाटील,प्रमुख, परिवर्तन पॅनेल 

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारkolhapurकोल्हापूर