शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर : स्टाफ पॅटर्नच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 10:58 IST

कोल्हापूर : प्रस्तावित स्टाफ पॅटर्नला विरोध म्हणून रविवारी (दि. ६) मध्यरात्रीपासून राज्यभरातील वीज कर्मचारी संपावर गेले. त्यात महावितरण , ...

ठळक मुद्दे स्टाफ पॅटर्नच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा संपमहावितरणसमोर द्वारसभा : जोरदार निदर्शने

कोल्हापूर : प्रस्तावित स्टाफ पॅटर्नला विरोध म्हणून रविवारी (दि. ६) मध्यरात्रीपासून राज्यभरातील वीज कर्मचारी संपावर गेले. त्यात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील कर्मचारी सहभागी झाले. या कंपन्यांच्या कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांनी ताराबाई पार्कमधील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन सोमवारी जोरदार निदर्शने केली. परंतू या संपामुळे जिल्ह्यांत कुठेही वीज पुरवठा विस्कळीत झाला नसल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे.वीज मंडळातील तिन्ही कंपन्यामध्ये प्रस्तावित स्टाफ पॅटर्न लागू करण्यात येणार असून त्याविरुध्द कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. हा पॅटर्न ५ मंडल मध्ये येत्या १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहे. या पॅटर्नमुळे कर्मचाऱ्यांची पदे कमी होतील. अगोदरच वीज ग्राहक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे पदे कमी झाल्यास आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढेल अशी भिती कर्मचाऱ्यांना आहे. त्याशिवाय पेन्शन योजना लागू करा अशीही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठीच हे कर्मचारी संपावर गेले आहेत.या आंदोलनाअंतर्गत कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर वीज कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. त्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने आणि सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात वीज कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले. त्यात ‘वर्कर्स फेडरेशन’चे शकील महात, ‘एसईए’चे विनायक पाटील, ‘इंटक’चे चंद्रशेखर पुरंदरे, ‘कामगार महासंघा’चे तानाजी हातकर, ‘तांत्रिक कामगार संघटने’चे विजय चव्हाण, आदी सहभागी झाले. दरम्यान, महावितरणच्या कार्यालयासमोरील द्वारसभेत सुमारे १५०० कर्मचारी सहभागी झाले. आज -उद्या देशव्यापी संपविद्युत कायदा २००३ मध्ये कांही बदल सुचविण्यात आले असून हा कायदा आता संसदेत मांडण्यात येणार असून, त्यात केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे वीज क्षेत्रावरच गंडांतर येणार आहे. याविरोधात देशभरातील वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट आहे. त्यांनी आज, व उद्या, बुधवारी होणाऱ्या कामगारांच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

वीजपुरवठा सुरळीतचा दावाकोल्हापूर परिमंडलाच्या हजेरी पटावरील ३८६६ कर्मचाऱ्यांपैकी १५०४ कर्मचारी सोमवारी उपस्थित होते. २२६५ कर्मचारी अनुपस्थित अथवा संपावर, ९७ कर्मचारी रजा अथवा साप्ताहिक सुटी अथवा दौऱ्यावर होते. तरीपण वीजपुरवठा सुरळीत आहे. बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी आणि संपावर नसलेल्या कर्मचाऱ्यांमुळे संपकाळात वीजसेवा सुरळीत सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची १२५ वीज उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेतली.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर