शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर  : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:08 IST

लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये विसंवाद होण्याच्या अनेक शक्यता निर्माण होतात, तरीही संवादाने प्रश्न सुटू शकतात, हे हसत-खेळत सांगणाऱ्या ‘आधी बसू, मग बोलू’ या नाटकाला सखींनी उत्स्फूर्त अशी दाद दिली.

ठळक मुद्देहास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद सखी मंचसाठी युनिकची सवलत

कोल्हापूर : लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये विसंवाद होण्याच्या अनेक शक्यता निर्माण होतात, तरीही संवादाने प्रश्न सुटू शकतात, हे हसत-खेळत सांगणाऱ्या ‘आधी बसू, मग बोलू’ या नाटकाला सखींनी उत्स्फूर्त अशी दाद दिली.

‘लोकमत’ सखी मंचच्या सभासदांसाठी आयोजित विद्यासागर अध्यापक लिखित, धनंजय पाटील दिग्दर्शित ‘आधी बसू ...’ या नाटकाचा प्रयोग सोमवारी (दि. १३) केशवराव भोसले नाट्यगृहात संध्याकाळी साडेचार वाजता संपन्न झाला.प्रत्येक संवादाला उडणारे हास्याचे तुषार आणि संवादाला मिळणारी दाद जणू कलाकारांना सखींची पोहोचपावतीच देऊन गेली. राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविणारे युनिक अकॅडमी कार्यक्रमाचे प्रायोजक होते.सुरुवातीला युनिक अकॅडमीचे संचालक प्रा. शशीकांत बोराळकर, मनीषा बोराळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. लोकमत सखी मंचच्या संयोजन समिती सदस्यांच्या हस्ते प्रा. बोराळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. बोराळकर म्हणाले, ‘यशाचा मार्ग हा कष्टप्रद असतो. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो.’विनोदी अंगाने संसाराचे सार सांगणारे नाटक नाट्यरंगच्या कलाकारांनी लीलया पेलले. यामध्ये महेश भूतकर (रमेश), केतकी पाटील (स्मिता), विद्या डांगे (अनघा), राजा बांबुळकर (विनायक ), गायत्री महाजन (विशाखा) आणि धनंजय पाटील (अजय) कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने सखींना रिझवले. यासाठी प्रकाशयोजना (कपील मुळे), संगीत (उमेश नेरकर), नेपथ्य (मिलिंद अष्टेकर), पार्श्वसंगीत ( हृषीकेश जोशी), आदींचे साहाय्य लाभले.सखी मंचसाठी युनिकची सवलतलोकमत सखी मंच सभासद व त्यांच्या कुटुंबीयांना स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी ‘युनिक अकॅडमी’ मध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास शुल्कात २५ टक्के सवलत देण्याच्या कार्यक्रमात संचालक प्रा. शशीकांत बोराळकर यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर