शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जनताच सरकारला आॅनलाईनने घालवेल- हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 17:43 IST

राज्य व केंद्रातील भाजप सरकार सूडभावना व फसवणूकीचे राजकारण करत आहे. दीड वर्षे कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळ्या अटी घालून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असून १३ हजार कोटी पेक्षा अधिक कर्जमाफीची रक्कम होऊच शकत नाही. सर्व प्रक्रिया आॅनलाईनमध्ये अडकल्याने वैतागलेली जनता आता सरकारलाच आॅनलाईनने घालवेल. असा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.

ठळक मुद्देकोल्हापूर : जनताच सरकारला आॅनलाईनने घालवेल- हसन मुश्रीफरविवारच्या पुण्यातील मेळाव्याला दहा हजार कार्यकर्ते जाणार

कोल्हापूर : राज्य व केंद्रातील भाजप सरकार सूडभावना व फसवणूकीचे राजकारण करत आहे. दीड वर्षे कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळ्या अटी घालून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असून १३ हजार कोटी पेक्षा अधिक कर्जमाफीची रक्कम होऊच शकत नाही. सर्व प्रक्रिया आॅनलाईनमध्ये अडकल्याने वैतागलेली जनता आता सरकारलाच आॅनलाईनने घालवेल. असा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिनी रविवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा सांगता समारंभ होत आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.साखर पॅकेजची खिल्ली उडवत ह सन मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारचे पॅकेज म्हणजे साखर उद्योगाच्या डोळयात धूळफेक आहे. सामान्य माणसाला अल्प व्याजदराने कर्जपुरवठा व्हावा, यासाठी राष्ट्रीयकृत बॅँका सुरू झाल्या पण आता उद्योगपतींनीच या बॅँका बुडविल्या.

सरकारची कामगिरी पाहता आता लहान मुलाला विचारले तरी हे सरकार जाणार असेच सांगेल. त्यामुळे सरकारविरोधात आक्रमकपणे बाहेर पडले पाहिजे. रविवारी पुण्यात होणाऱ्या हल्लाबोल सांगता मेळाव्याला जिल्ह्यातील दहा हजार कार्यकर्ते रवाना होतील, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेची कोल्हापूरातून सुरूवात झाली. त्याची सांगता पुण्यात होत असून कार्यकर्त्यांनी ताकदीने सहभागी व्हावे. माजी खासदार निवेदिता माने, माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, संगीता खाडे, आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी नियोजनाचा आढावा घेतला. माजी आमदार के. पी. पाटील, उपमहापौर महेश सावंत, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, भैया माने, मधूकर जांभळे, सर्जेराव पाटील-गवशीकर, शिवानंद माळी, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते. रोहित पाटील यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूरGovernmentसरकार