शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मला संपवायचे की नाही जनताच ठरवेल : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:51 IST

मला राजकीय पटलावरून संपवू, अशी दर्पोक्ती महाडिक यांनी करू नये; कारण हा मुश्रीफ दलाल व व्यापाऱ्यांच्या पाठबळावर राजकारणात उभा राहिलेला नाही.

कोल्हापूर : मला राजकीय पटलावरून संपवू, अशी दर्पोक्ती महाडिक यांनी करू नये; कारण हा मुश्रीफ दलाल व व्यापाऱ्यांच्या पाठबळावर राजकारणात उभा राहिलेला नाही. मला संपवायचे का उभारी द्यायची, याचा निर्णय या जिल्ह्यातील गोरगरीब जनताच घेईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी सायंकाळी लगावला.महादेवराव महाडिक यांचे गोकुळ दूध संघातील गैरव्यवहार व व्यक्तिगत धंदे बाहेर काढावयाचे झाल्यास एक भलीमोठी अखंड कादंबरी होईल. अशांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, अशीही टीका मुश्रीफ यांनी केली. महाडिक यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्यास मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे उत्तर दिले.

पत्रकात म्हटले आहे, ‘केवळ आपल्या बदनामीसाठी खोटे व गंभीर आरोप करणाºया महाडिक यांच्यावर पाच कोटींचा बदनामीचा दावा दाखल करणार आहे. आठ दिवसांत आरोपांबद्दल वस्तुनिष्ठता त्यांनी सांगावी; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे.’

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन्ही नेत्यांनी अट्टाहासाने ठेवला आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्याला विरोध करण्याचा मी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला. विशिष्ट वळणावर संघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला होता, याचा अर्थ हा संघ मल्टिस्टेट करून घशात घाला असा नव्हे. जनतेच्या भावना मीही व्यक्त केल्या, तर माझे वक्तव्य यांच्या मनाला एवढे का लागावे, असा सवालही त्यांनी केला.महाडिक हेही जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यांनाही हैदराबाद व दुबई दौºयाबाबत माहिती घेण्याचा अधिकार आहे. बँकेमध्ये आतापर्यंत हार्डवेअरची खरेदीच झालेली नाही. संचालकांच्या सहली या स्वखर्चातून झाल्या आहेत. महाडिक हे सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुलेच आहेत. त्यांनी कधीही या विषयांची ‘सीआयडी’ चौकशी लावावी आणि तो खर्च झालेला पैसा स्पॉन्सर्ड होता की व्यक्तिगत होता हे त्यांनी शोधावे. बँकेच्या संचालक मंडळाच्या सहलीच्या संदर्भाने महाडिक यांनी केलेल्या खोट्या व गलिच्छ आरोपामुळे बँकेच्या संचालक मंडळाची नाहक बदनामी झाली आहे. या सहलीमध्ये संचालक मंडळातील भगिनीही होत्या, याचे भान त्यांनी बाळगावे.’केडीसीसी बँकेतून माझ्या मुलाच्या नावावर विमा घेतला जातो, असा आरोप करणाºया महाडिक यांनी माहिती घेऊन बोलावे, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, ‘आपले झाकण्यासाठीच चुकीचे वक्तव्य करून बदनामी करण्याचा महाडिक यांचा डाव कदापिही चालू देणार नाही. बँकेत आम्ही भत्ता घेत नाही आणि कसलाही अवांतर खर्चही करीत नाही. महाडिक यांनी स्वत:चे झाकण्यासाठी बँकेची नाहक बदनामी करू नये.’पुतण्याला पराभूत करण्यासाठीच आरोप?महाडिक ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आरोप करीत आहेत ते पाहता त्यांना पुतण्या धनंजय महाडिक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने पराभव करावा असे वाटते का, अशी शंका येत असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.स्वत:चीच लाज वाटली‘गोकुळ’मधून महाडिक यांना कोणते फायदे मिळतात, हे बच्चा-बच्चा जानता है. आयुष्यात मी नोकरभरतीत साधा चहासुद्धा पिऊन लाजीम झालो नाही; परंतु ‘गोकुळ’च्या भरतीत पंधरा ते वीस-वीस लाख रुपये घेऊन यांनी दुकान उघडले. हे ऐकून मला स्वत:चीच लाज वाटली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफPoliticsराजकारण