शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

दीड वर्षे प्रयत्न करीत होते; कोल्हापूरच्या बालवैज्ञानिकांना लंडनला जाण्यासाठी हवीय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:54 IST

नसिम सनदी । कोल्हापूर : कोल्हापुरातील बालवैज्ञानिकांनी संशोधित केलेला रोबोट आता थेट लंडनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार ...

ठळक मुद्देरोबोटची निर्मिती। वि. स. खांडेकर प्रशालेचे लखलखीत यश --सहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

नसिम सनदी ।कोल्हापूर : कोल्हापुरातील बालवैज्ञानिकांनी संशोधित केलेला रोबोट आता थेट लंडनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आंतरभारती शिक्षण संस्थेच्या वि. स. खांडेकर प्रशाला या सर्वसामान्यांच्या शाळेतील दहावीच्या वर्गातील चार विद्यार्थ्यांनी दीड वर्षाच्या अथक प्रयत्नांनी हे लखलखीत यश साकारले आहे. जूनमध्ये लंडनला जाण्याची संधी मिळणारी ही कोल्हापुरातील एकमेव शाळा ठरली आहे. अनिकेत लोहार, सौरभ जाधव, अथर्व मोहिते, सोहम फडके या सामान्य कुटुंबांतून आलेल्या मुलांनी हा रोबोट तयार केला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा स्वयंचलित हाताळणाºया रोबोटिक तंत्रज्ञानाने अवघ्या जगावर गारूड केले आहे. मग त्यापासून शालेय विद्यार्थी तरी कसे लांब राहणार? जिज्ञासू, संशोधन वृत्ती अंगी असणा-या या मुलांना अटल टिकरिंग लॅबने संशोधनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि या संधीचे सोने करीत हे बालवैज्ञानिक आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोल्हापुरात शाहूपुरी व्यापारपेठेतील या शाळेतील विद्यार्थ्यांनीही यावर्षी नोव्हेंबरमध्ये कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय निवड स्पर्धेत सहभाग घेतला.

रोबोटिकला प्रथम क्रमांक मिळून ते राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाले. १५ डिसेंबरला दिल्लीत झालेल्या स्पर्धेत देशभरातील १८६ संघांतून यांच्या रोबोटिकला चौथा क्रमांक मिळून ते लंडनमध्ये जून २०२० मध्ये होणाºया स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. भरत शास्त्री, प्रमोद कुलकर्णी, वंदना काशीद, नेहा कनेकर या शिक्षकांचे यामागील श्रम लाखमोलाचे आहेत.

सर्वसामान्य घरातील मुलांचे असामान्य कामया चारही बालवैज्ञानिकांची घरची परिस्थिती बेताचीच; पण या पोरांचा आत्मविश्वास आणि स्वप्ने मात्र आकाशालाही आपल्या कवेत घेण्यासारखी आहेत. रोबोटिक इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या सोहमचे वडील नोकरी करतात; तर आई गृहिणी आहे. कमीत कमी वेळेत रोबोट तयार करण्यावर येथून पुढे भर राहील असे तो सांगतो. दसरा चौकात राहणा-या अनिकेत लोहारचे वडील साधे फॅब्रिकेटर, तर आई नोकरी करते. पाचवीपासूनच तोडण्या-जोडण्याच्या छंदानेच संशोधनाकडे वळविल्याचे सांगून सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा तो व्यक्त करतो. राजारामपुरीतील सौरभ जाधवचे वडील आॅफिसबॉय, तर आई गृहिणी. अ‍ॅनिमेशन डिझायनर होण्याचे त्याचे स्वप्न आहे. सम्राटनगरातील अथर्व मोहितेचे वडील बँकेत नोकरीस, तर आई गृहिणी. मित्रासमवेत गोडी लागली आणि यात लक्ष घातले. इलेक्ट्रिकलमध्ये करिअर करायचे आहे, असे तो आत्मविश्वासाने सांगतो.

खर्चाची विवंचनालंडनला जाण्याची संधी मिळत असल्याने या बालवैज्ञानिकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे; पण स्पर्धेत चौथ्या स्थानी असल्याने खर्चाचा भार वैयक्तिकरीत्या उचलावा लागणार आहे. खांडेकर प्रशाला ही सर्वसामान्य वर्गातील मुलांची शाळा आहे. एकेका मुलाचा लाखाचा खर्च परवडणारा नसल्याने आता संस्थेने मदतीचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. सहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

वि. स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातून रोबोट साकारला आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLondonलंडनscienceविज्ञान