शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आपत्तीमुळे ‘कोल्हापूर पॅटर्न’चा उदय : कलशेट्टी : प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:12 AM

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनात ‘कोल्हापूर पॅटर्न’चा उदय झाला. इतके चांगले काम कोल्हापूरकरांनी केले, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे बोलताना केले.

ठळक मुद्दे आपत्तीमुळे ‘कोल्हापूर पॅटर्न’चा उदय : कलशेट्टी प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा निर्धार

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटावर मात करण्याकरीता शासकीय, निमशासकीय तसेच शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, कार्यकर्त्यांनी दाखविलेले धैर्य आणि केलेली मदत यामुळे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनात ‘कोल्हापूर पॅटर्न’चा उदय झाला. इतके चांगले काम कोल्हापूरकरांनी केले, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे बोलताना केले.आॅगस्ट महिन्यात निर्माण झालेल्या महापुराच्या परिस्थितीत विशेष कामगीरी बजावलेल्या महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांबद्दल आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात आयुक्त कलशेट्टी बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या. सोहळ्यात कोल्हापूर शहराला प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला.महापुरामध्ये सापडलेल्या आपल्या सहकाऱ्यांचा बचाव करण्यासह त्यांना मदत करण्यात घेतलेला पुढाकार अभूतपूर्व होता. कोणत्याही संकटावेळी धावून जाण्याची कोल्हापूरकरांच्या वृत्तीचे यानिमित्ताने दर्शन झाले. महापुराच्या काळात प्रत्येकाने काम केले म्हणूनच लवकर संकटातून बाहेर पडलो. त्याचे श्रेय कोल्हापूरकरांचेच आहे. आता ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्याकरीता आपणास प्रयत्न करायचे आहेत, असे आयुक्त म्हणाले.भविष्यात अशी पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आपण सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरवासीयाने मी प्लास्टिक वापरणार नाही, असा निर्धार करून प्लास्टिकमुक्त शहर करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आयुक्तांनी प्लास्टिकमुक्त शहर व स्वच्छ सुंदर शहर यासंदर्भात सर्वांना शपथ दिली.जेथे शासन पोहोचले नाही तेथे कोल्हापूर पोहोचले, याचा सार्थ अभिमान आम्हाला नक्कीच आहे, असे सांगून उपमहापौर भूपाल शेटे यांनी सांगितले की, यापूर्वी आयुक्तांचे कौतुक करण्याचा कधीही प्रसंग आला नाही. मात्र, आज डॉ. कलशेट्टी यांचे संपूर्ण शहरवासीय कौतुक करतात. त्यांनी केलेले काम अतिशय चांगले होते, म्हणूनच संकटातून लवकर बाहेर पडलो. पृथ्वी हे शेषनारायणाच्या फण्यावर तरलेली नाही तर ती समाजातील सेवाभावी वृत्तीच्या लोकांमुळे तरली आहे.कारवाईत हस्तक्षेप नाही : देशमुखआयुक्तांनी शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमास साथ म्हणून आम्हीही आजच निर्धार करतोय की ज्या-ज्या विक्रेत्यांवर प्लास्टिक विरोधी कारवाई म्हणून पाच हजाराचा दंड होईल त्यावेळी आम्हा नगरसेवकांचा हस्तक्षेप असणार नाही, असे स्थायी सभापती शारंगधर देशमुख म्हणाले.पाच हजाराचा बोनस द्या : शेटेमहापालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी महापुरात तसेच महापुरानंतर स्वच्छतेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक करायचे असेल तर त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये बोनस द्यावा, अशी सूचना उपमहापौर शेटे यांनी केली. 

कायमचे पुनर्वसन : आयुक्तगेल्या अनेक वर्षांपासून महापूर आला की बाधित होणाऱ्या सुतारवाडा, लक्ष्मीपुरी परिसरातील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे, अशांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून देण्याचा आराखडा तयार करत आहोत, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर