शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मद्यपी गुन्हेगाराची लक्षतीर्थमध्ये दहशत, नागरिकांत भीती : बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 11:29 IST

चोरी, लुटमारी, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने लक्षतीर्थ वसाहत परिसरात मद्यधुंद अवस्थेत हातात कुऱ्हाड घेऊन प्रचंड दहशत माजविली. महिला, तरुण यांच्यासह पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्याच्या दहशतीपुढे एकही नागरिक तक्रार देण्यास पुढे आला नाही. गेल्या दोन दिवसांपासून नागरिक भीतीच्या छायेत आहेत.

ठळक मुद्देमद्यपी गुन्हेगाराची लक्षतीर्थमध्ये दहशतनागरिकांत भीती : बंदोबस्त करण्याची मागणी

कोल्हापूर : चोरी, लुटमारी, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने लक्षतीर्थ वसाहत परिसरात मद्यधुंद अवस्थेत हातात कुऱ्हाड घेऊन प्रचंड दहशत माजविली. महिला, तरुण यांच्यासह पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्याच्या दहशतीपुढे एकही नागरिक तक्रार देण्यास पुढे आला नाही. गेल्या दोन दिवसांपासून नागरिक भीतीच्या छायेत आहेत.लक्षतीर्थ वसाहतीमध्ये पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने दोन दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत अर्धनग्न अवस्थेत हातात कुऱ्हाड घेऊन परिसरात प्रचंड दहशत माजविली. महिला, तरुणांसह पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून पुढे याल तर तोडून टाकीन, अशी धमकी देत कुऱ्हाड फिरवत होता. त्याचा रुद्र अवतार पाहून पुढे जाण्याचे धाडस कोणी केले नाही. त्याच्या या रोजच्या दहशतीमुळे महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे.

लहान मुलेही बिथरली आहेत. लक्ष्मीपुरी पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पोलीसही आपले काय करू शकत नाहीत, अशा समजुतीपोटी या गुन्हेगाराने प्रचंड दशहत माजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परिसरातील खाद्य विक्रेत्यांना धमकावून त्यांच्याकडून फुकटात खाद्यपदार्थ घेत आहे. तो पोलिसांचा खबऱ्या असल्याने त्याच्या विरोधात कोणी पोलीस ठाण्याला फोन करीत नाही.

फोन केल्यास त्याला संबंधित नागरिकाचे नाव समजते. त्यानंतर तो त्रास देण्यास सुरू करतो. यामुळे त्याच्याशी कोणी वाकडे घेत नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या या मद्यपी गुन्हेगाराची दादागिरी पोलिसांनी मोडीत काढून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर