शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा बुधवारपासून, केएसडीए-नेताजी तरुण मंडळाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:28 IST

कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (केएसडीए) व नेताजी तरुण मंडळ यांच्यातर्फे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ २८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान शाहू स्टेडियम येथे ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे.

ठळक मुद्दे‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा बुधवारपासूनकेएसडीए- नेताजी तरुण मंडळाचे आयोजनपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बक्षिसांची स्पर्धा

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (केएसडीए) व नेताजी तरुण मंडळ यांच्यातर्फे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ २८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान शाहू स्टेडियम येथे ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघास ५, तर उपविजेत्या संघास तीन लाख रुपये रोख व आकर्षक चषक प्रदान केला जाणार आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व आमदार अमल महाडीक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची या स्पर्धेत विजेत्या उपविजेत्यांसह तृतीय व चतुर्थ क्रमांकास रोख ५० हजार, तर दुसऱ्या फेरीतून बाद होणाऱ्या संघास प्रत्येकी २० हजार रुपये दिले जाणार आहेत. यासह पहिल्या फेरीतून बाद होणाऱ्या संघास व फेअर प्ले संघास प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.

स्पर्धेतील विविध फळीतील उत्कृष्ठ खेळाडूंना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा, तर मालीकावीरास ७५ हजार रुपयांचा सोन्याचा दागिना दिला जाणार आहे. स्पर्धेनिमित्त रविवारी दुपारी मोटरसायकल रॅली, तर सोमवारी (दि. २६) व मंगळवारी (दि. २७) ला कोल्हापूरातील ज्येष्ठ फुटबॉल पटूंचा उभामारुती चौक व बालगोपाल तालीम मंडळ परिसरात सत्कार केला जाणार आहे.

स्पर्धेचे उदघाटन बुधवारी (दि. २८) सांस्कृतिक कार्यक्रम व १६ संघांचे संचलन असा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेतील सामने गुरुवारी (दि. २९) पासून सुरु होतील. अंतिम सामन्याचा बक्षिस समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे.पत्रकार परिषदेस नेताजी तरुण मंडळाचे राजू साळोखे, केएसडीएचे सुजय पित्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महापालिका स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, नगरसेवक विजय सुर्यवंशी, संभाजी जाधव, विजयसिंह खाडे, अशोक देसाई, प्रदीप साळोखे, राजू राऊत, दिग्विजय मळगे, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल