शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी गर्दी, महाविद्यालयांतील प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:38 IST

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी नाव नोंदणी आणि कागदपत्रांच्या तपासणीचा मंगळवारी अंतिम मुदत आहे.

ठळक मुद्दे पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी गर्दी, महाविद्यालयांतील प्रक्रिया सुरूअभियांत्रिकीच्या नोंदणीची मंगळवारी अंतिम मुदत

कोल्हापूर : कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी नाव नोंदणी आणि कागदपत्रांच्या तपासणीचा मंगळवारी अंतिम मुदत आहे.बारावीच्या मूळ गुणपत्रिकांचे वाटप दि. १२ जूनला झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून शहरातील विवेकानंद महाविद्यालय, गोखले कॉलेज, महावीर महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, न्यू कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, केएमसी कॉलेज, नाइट कॉलेज, शहाजी कॉलेज, कॉमर्स कॉलेज, कमला कॉलेज या महाविद्यालयांमध्ये  पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यातील विवेकानंद महाविद्यालय आणि गोखले कॉलेजकडून आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे.

आॅफलाईन पद्धतीने अर्ज वितरण आणि संकलन सुरू असलेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रथम वर्षाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन वरिष्ठ महाविद्यालयांनी केली आहे. बहुतांश महाविद्यालयांतील प्रथम वर्षाचे वर्ग दि. १ जुलैपासून सुरू होणार आहेत.‘आरटीई’अंतर्गत प्रवेशाची २५ जूनपर्यंत मुदतबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ३१८३ अर्ज मिळाले.

सदर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या दुसऱ्या प्रवेश फेरीतून ७२६ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश निश्चित केला. त्यांची यादीवरील लिंकवर अपलोड केली आहे, तरी पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित शाळेत जावून पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. त्यासाठीची अंतिम मुदत दि. २५ जूनपर्यंत आहे.

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर