शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे निधी देण्याची केवळ घोषणाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:55 IST

सर्वच समाजांतील गोरगरीब तरुणांच्या हातांना काम मिळावे, यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देण्याची केलेली घोषणा गेली दोन वर्षे हवेतच आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा केली होती; परंतु तरीही हा निधी महामंडळास आजअखेर मिळालेला नाही. माहितीच्या अधिकाराखाली त्यासंबंधीची माहिती उघड झाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले २०० कोटी हवेतच...!मराठा समाजाची फसवणूक

विश्वास पाटील

कोल्हापूर : सर्वच समाजांतील गोरगरीब तरुणांच्या हातांना काम मिळावे, यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देण्याची केलेली घोषणा गेली दोन वर्षे हवेतच आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा केली होती; परंतु तरीही हा निधी महामंडळास आजअखेर मिळालेला नाही. माहितीच्या अधिकाराखाली त्यासंबंधीची माहिती उघड झाली आहे.सकल मराठा समाजाची मूळ मागणी या महामंडळासाठी किमान पाच हजार कोटी रुपये अनुदान द्यावे, अशी होती; परंतु त्यातील २०० कोटी देण्याचे सरकारने जाहीर केले; परंतु ते देण्यातही चालढकल केल्यामुळे मराठा समाजातून सरकार फसवणूक करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रदीप आत्माराम काशीद यांनी महामंडळाकडे माहितीच्या अधिकाराखाली निधीबाबत विचारणा केली होती. त्याला महामंडळाकडून अजून निधी मिळाला नसल्याचे कळविले आहे.

सद्य:स्थितीत महामंडळाकडे ७३ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. महामंडळाकडून विविध कर्जयोजनांतून ५०० कोटी रुपयांची कर्जमागणी झाली आहे. त्यावरील व्याज परतावा महामंडळ देणार आहे. ही कर्जे मंजूर झाली तर त्यावरील व्याजापोटी किमान १०० कोटींचा निधी लागेल; परंतु तेवढा निधी आता महामंडळाकडे उपलब्ध नाही.  स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला निधी अजून महामंडळास मिळालेला नाही; तो द्यावा म्हणून महामंडळाकडून वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. महामंडळास देण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे शासनाने २०१७ मध्ये कळविले; परंतु मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले २०० कोटी व नंतर तरतूद केली म्हणून सांगितलेले ४०० कोटी यांपैकी आजअखेर एक गिन्नीही महामंडळास मिळालेली नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

या महामंडळाची स्थापना शिवसेना-भाजप युतीच्या काळात १९९८ मध्ये झाली. त्यावेळी शासनाने जाहीर केलेले ५० कोटींचे अनुदान टप्प्याटप्प्याने चक्क २०१० मध्ये मिळाले. ही रक्कम व व्याज परताव्याची मिळालेली रक्कम असे ७३ कोटी रुपये सध्या महामंडळाकडे उपलब्ध आहेत.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: केलेली घोषणाही सरकार पूर्ण करीत नसेल तर त्यासारखी चीड आणणारी गोष्ट दुसरी कोणती नाही. सकल मराठा समाजाकडून सरकारवर आरक्षणापासून विविध योजनांबाबत मोठा दबाव आहे. आम्ही त्याचा पाठपुरावाही करीत आहोत; परंतु तरीही निधी देण्याबाबत चालढकल केली जात आहे. सरकारने हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा.- इंद्रजित सावंतसकल मराठा समाज नेते

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर