शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भाजीपाल्याच्या दरात वाढ, आवक घटल्याने कांदाही वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 12:43 IST

पावसामुळे भाजीपाल्याची आवक काहीशी मंदावल्याने दरात वाढ झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कोबी, घेवडा, गवार, दोडक्याच्या दरांत वाढ झालेली दिसते. अननस व तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढल्याने फळबाजार या दोन फळांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. आवक कमी झाल्याने कांदा मात्र चांगलाच वधारला आहे.

ठळक मुद्दे भाजीपाल्याच्या दरात वाढ, आवक घटल्याने कांदाही वधारला  अननस, तोतापुरीने फळबाजार हाऊसफुल्ल

कोल्हापूर : पावसामुळे भाजीपाल्याची आवक काहीशी मंदावल्याने दरात वाढ झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कोबी, घेवडा, गवार, दोडक्याच्या दरांत वाढ झालेली दिसते. अननस व तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढल्याने फळबाजार या दोन फळांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. आवक कमी झाल्याने कांदा मात्र चांगलाच वधारला आहे.गेल्या आठ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीतील भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यात स्थानिक भाजीपाल्याची आवक पूर्णपणे ठप्प असल्याने दर वाढले आहेत.

बाजार समितीत २०० पोती कोबी, तर ४०० पोती ओल्या मिरच्यांची आवक होते. कारली, गवार, भेंडी, दोडक्याची आवकही कमी झाल्याने दर चांगलेच तेजीत आहेत. घेवड्याची आवक सुरू झाली असून मागणी अधिक असल्याने दर चांगलेच भडकले आहेत.

घेवड्याचा दर घाऊक बाजारात ५५ रुपये, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे. कोथिंबिरीची आवक थोडी वाढली असून, दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात १२ रुपये पेंढी आहे. मेथी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून घाऊक बाजारात कांदा १५ रुपये किलो झाला आहे. बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारसा चढउतार नसला तरी गेले दोन-तीन महिने घसरलेला लसणाचे दर सुधारण्यास सुरुवात झाली आहे.

पावसामुळे फळबाजारामध्ये थोडी शांतता दिसत असली तरी तोतापुरी आंबा व अननसची आवक चांगली आहे. कोल्हापुरात तोतापुरी आंब्याची रोज १५ टन आवक होत आहे.

कर्नाटकातून अजून आंब्याची आवक होत आहे. रायवळ, दशेरी आंबा बाजारात दिसत आहे. डाळिंबाची आवक व दर स्थिर आहे. लिंबूची आवक कमालीची वाढली असून, दर एकदमच खाली आले आहेत. लहान लिंबू रुपयांना दोन मिळत आहेत.साखर, तूरडाळ, हरभरा डाळीसह सर्वच डाळींचे दर तुलनेने स्थिर आहेत. सरकी तेल, खोबरेल व शेंगतेलाच्या दरातही फारशी चढउतार दिसत नाही. पोहे, शाबूदाण्याच्या दरात थोडीफार वाढ झालेली दिसते.मक्याच्या कणसांची आवक वाढलीमक्याच्या कणसांची आवक वाढली आहे. पावसाचा जोर जसा वाढेल तशी मागणीही वाढत आहे. घाऊक बाजारात सरासरी पाच रुपये कणीस मिळत असले तरी किरकोळ बाजारात दहा रुपये दर आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर