शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  विस्कळीत पाणी पुरवठ्याबद्दल अधिकाऱ्यांना झापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:35 IST

कोल्हापूर शहरात वारंवार विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याबद्दल शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना झापले. ‘काय करायचे ते एकदाच करा; पण नागरिकांना व्यवस्थित पाणी पाजा,’ अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.

ठळक मुद्दे विस्कळीत पाणी पुरवठ्याबद्दल अधिकाऱ्यांना झापलेमहापालिका स्थायी सभा : सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

कोल्हापूर : शहरात वारंवार विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याबद्दल शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना झापले. ‘काय करायचे ते एकदाच करा; पण नागरिकांना व्यवस्थित पाणी पाजा,’ अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.गेल्या काही महिन्यांपासून शहरात वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नियोजनाचा अभाव आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे, अशा भावना व्यक्त करीत अफजल पीरजादे यांनी जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना सभेत झापले. त्यावेळी कुलकर्णी यांनी जलवाहिन्या जुन्या व खराब आहेत. त्यांना गळती लागली की पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘काय करायचे ते एकदाच करा, वारंवार असे प्रकार घडतात, ते थांबले पाहिजेत,’ असे अफजल पीरजादे यांनी सांगितले.सिद्धार्थनगर व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नियमित पाणीपुरवठा केव्हा होणार आहे? प्रत्येक वेळी वीजपुरवठ्याचे कारण सांगितले जाते. त्याबद्दल कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असेही पीरजादे यांनी बजावले. बालिंगा येथील ट्रान्स्फॉर्मर जळाला होता, तो दुरुस्त करून घेण्यात आला असल्याने यापुढे पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.सभेत आरोग्य विभागाच्या कारभारावरही ताशेरे ओढले गेले. आरोग्य विभागात कर्मचारी कमी असल्याने प्रभागात कचरा उठाव सुरळीत होत नसल्याची तक्रार प्रतिज्ञा निल्ले यांनी केली. कर्मचाऱ्यांची विभागणीही चुकीची असून एका प्रभागात ४०, तर दुसऱ्या प्रभागात १० असे कर्मचारी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे समान वाटप करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. कपिलतीर्थ मार्केटमधील पार्किंगच्या जागेत कोंड्याळ्यातील कचरा इतरत्र पसरलेला असतो, त्याचा नागरिकांना त्रास होतो, याकडे दीपा मगदूम यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.निकम पार्क क ंपौंडची आवश्यक ती जागा सात दिवसांची नोटिसीची मुदत संपल्यानंतर ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना मगदूम यांनी अधिकाऱ्यांना दिली. शहरात मोठ्या प्रमाणात हातगाड्या रस्त्यावर लागत आहेत. रस्त्यांवर, पदपथावर अतिक्रमण वाढत आहे. तातडीने या अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी संजय मोहिते यांनी केली. 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर