शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

कोल्हापूर : कोषागार कर्मचाऱ्यांच्या सामुहिक रजेमुळे कार्यालय ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:22 PM

कोषागार कर्मचाऱ्यांच्या (गट-क) विविध प्रलंबित मागण्यांकरिता गेले दोन दिवस सुरु असलेल्या सामुहिक रजा आंदोलनामुळे सोमवार पेठेतील जिल्हा कोषागार कार्यालय शुक्रवारी ओस पडले होते. या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास सहा जूनपासून कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्दे कोषागार कर्मचाऱ्यांच्या सामुहिक रजेमुळे कार्यालय ओसजिल्हा शाखेच्या संघटनेचे आंदोलन निर्णय न झाल्यास सहा जूनपासून बेमुदत संपावर

कोल्हापूर : कोषागार कर्मचाऱ्यांच्या (गट-क) विविध प्रलंबित मागण्यांकरिता गेले दोन दिवस सुरु असलेल्या सामुहिक रजा आंदोलनामुळे सोमवार पेठेतील जिल्हा कोषागार कार्यालय शुक्रवारी ओस पडले होते. या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास सहा जूनपासून कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला.या आंदोलनात एकूण ६८ कर्मचारी सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे यांना दिले.यावेळी कर्मचाऱ्यांनी कार्यालय आवारात निदर्शने केली.कर्मचारी कार्यालयात नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागत होते.

कोषागारातील लेखा लिपिक यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, गट क ची ३२ टक्के पदे रिक्त आहेत, त्या जागा भराव्यात, २००८ नंतर पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सामावुन घ्यावे. कोषागारातील ७०० वरिष्ठ लेखापाल पदासाठी २० टक्के म्हणजेच १४० पदे सहाय्यक लेखा अधिकारी यांना पदोन्नती मिळाव्यात आदी मागण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या आवारात गट-क च्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.निदर्शनात जिल्हा शाखेचे अध्यक्ष संतोष साळोखे, सरचिटणीस धीरज सणगर, सुदर्शन कुंभार, दीपक शिंदे, भारत पाटोळे, दिनकर टिपुगडे, सचिन कुंभार, गजानन शिंदे, दीपक कांबळे, अजित कांबळे, जयदीप कुंभार, प्रमोद कलकुटकी आदींचा सहभाग होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEmployeeकर्मचारी