शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बेघरांसाठी आता चोवीस तास निवाऱ्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:01 IST

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत कोल्हापूर शहरात आढळून येणाऱ्या बेघर ...

ठळक मुद्देबेघरांसाठी आता चोवीस तास निवाऱ्याची सोयचहा, नाष्टा, जेवणही मोफत : महापालिकेचा उपक्रम

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत कोल्हापूर शहरात आढळून येणाऱ्या बेघर व निराश्रित लोकांना आत २४ तास निवाऱ्यांची सोय उपलब्ध झाली आहे.शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील जेमस्टोन बिल्डिंग, लक्ष्मीपुरीतील व्यापारी संकुल, शिरोली जकात नाका व शाहू नाका या ठिकाणी १४१ बेड असलेले निवारे महापालिकेने उपलब्ध केले आहेत. स्त्री, पुरुष, दिव्यांग व आजारी लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

या निवाऱ्यांमध्ये वयस्कर, आजारी व लहान मुलांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा मोफत दिले जाते. इतर कमवत्या व्यक्तींकडून नाममात्र शुल्क घेतले जाते. तसेच या ठिकाणी आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, रोजगार, गरम पाणी यांची सोय असून शासकीय उपक्रमात लाभ घेण्यासाठी साहाय्य केले जाणार आहे. सध्या प्रतिदिन ३० ते ४० लोक याचा लाभ घेत आहेत.या निवाऱ्यांचे देखभाल व व्यवस्थापन करण्यासाठी ‘एकटी’ संस्थेची निवड करण्यात आली आहे. निवाऱ्याच्या ठिकाणी व्यवस्थापक व काळजीवाहक यांची या संस्थेमार्फत निवड होऊन काम पाहिले जाते. संस्था व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत बेघरांचे रात्री सर्वेक्षण करून अशा लोकांना निवाऱ्यांमध्ये दाखल केले जाते. तिथे त्यांच्या स्वच्छता, आरोग्य या बाबींकडे लक्ष देऊन, त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जातो. निवारा सुरू झाल्यापासून आजतागायत १५९ महिलांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.शहरात कोठेही बेघर व निराश्रित व्यक्ती आढळल्यास ‘एकटी’ संस्थेशी संपर्क साधावा; तसेच इच्छुकांनी अन्नदान करण्याचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. 

ज्यांना अन्नदान करायचे आहे त्यांनी या फोन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.दूरध्वनी क्रमांक- एकटी संस्था- ०२३१-२६६१४४०, ९५०३०६७१०० , ९९२२२०१७७३, ९८८१३२०९४६, ९७६५४५३५३५. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर