शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आता आॅनलाईन तक्रारीची सुविधा : अरुण देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 11:13 IST

ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली. ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआता आॅनलाईन तक्रारीची सुविधा : अरुण देशपांडेयेत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात

कोल्हापूर : ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली.

ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जि. प. महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, ग्राहक सल्लागार समिती पुणे विभाग किशोर लुल्ला आदी उपस्थित होते.बैठकीत अरुण देशपांडे यांनी अन्न व औषध प्रशासन, वजन-मापे, कृषी, शिक्षण, आरोग्य, महावितरण आदी विभागांच्या ग्राहक तक्रारींबाबतचा सविस्तर आढावा घेतला.देशपांडे म्हणाले, येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाणार आहे. याबाबतची कार्यवाही राज्यस्तरावर सुरू आहे. ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा याबाबत या ग्राहक धोरणांमध्ये विचार करण्यात आला आहे.नंदकुमार काटकर यांनी जिल्ह्यात भेसळ होत असल्याचे निदर्शनास आलेल्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे, असे सांगितले.यावेळी जिल्हा ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य जगन्नाथ जोशी, अनिल जाधव, पांडुरंग घाटगे, पुलाजी खैरे, दिलीपराव घाटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टोल फ्री क्रमांकावरील तक्रारीनंतर ७२ तासांत कारवाईग्राहकांची फसवणूक झाल्यास किंवा योग्य सेवा मिळाली नाही तर त्यांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार तत्काळ नोंदवावी. तक्रार नोंद केल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधितांवर कारवाई करून त्याचा अहवाल ग्राहकाला मिळतो. हा क्रमांक चोवीस तास सुरू आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार