शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गावगाड्यात घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलले : कृष्णात खोत : भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:46 IST

गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देकोल्हापूर : भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालागावगाड्यात घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलले : कृष्णात खोत

कोल्हापूर : गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली.करवीर नगर वाचन मंदिर येथे आयोजित भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत ‘बदलता गाव-एक चिंतन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कनवा’चे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे होते. प्रमुख उपस्थिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश जाधव, ‘कनवा’चे कार्यवाह सतीश कुलकर्णी, दीपक गाडवे, प्रा. अनंत जयतीर्थ आदींची होती.प्रा. खोत म्हणाले, ग्रामशैली आता बदलत चालली आहे. अगदी चुलीपासून स्वयंपाकघर, गोठा यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसत आहे. या सुधारणा म्हणायच्या की सूज हाच एक प्रश्न निर्माण झाला आहे. माणसांनी आता घरांबरोबर ग्रामदैवतही बदलली आहेत. या देवतांऐवजी राजकीय पक्षांची आणि नेत्यांचीच मंदिरे झाली आहेत.

कारण गावातील एका राजकीय गटाकडून एका देवाचे मंदिर बांधले तर दुसऱ्या गटाकडून त्याच देवाचे मंदिर बांधले जाते. त्यामुळे मूळ ग्रामदैवताकडे दुर्लक्ष होऊन ते अडगळीत पडून सोयी-सुविधांपासून वंचित राहत असल्याचे सद्य:चित्र आहे.ते पुढे म्हणाले, गावातील चुलीवर काय शिजतयं त्यावर तेथील संस्कृती, अर्थशास्त्र व समाजशास्त्र कळायचे, परंतु त्या चुलीवर काय शिजत नसेल तर नक्कीच काही तरी अर्थशास्त्र बिघडले आहे हे समजून यायचे. सर्वाधिक प्रयोग हे शेती व शिक्षणावर झाले; परंतु दुर्दैवाने दोन्ही क्षेत्रे मागे आहेत.

शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न झाला पण शेतकऱ्यांचा नाही हे वास्तव आहे. पूर्वी शेतीत राबविली जाणारी पद्धतीच आता नव्याने सांगितली जात आहे. ग्रंथपाल मनिषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. सहकार्यवाह अश्विनी वळिवडेकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य