शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे संचालक मंडळ बरखास्त का करू नये, विभागीय उपनिबंधकांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 18:37 IST

राज्य सरकारने आदेश देऊनही गाय दूध खरेदी दरात वाढ केली नसल्याने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी ‘गोकुळ’ दूध संघाला नोटीस बजावली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल संचालक मंडळ बरखास्त का करू नये? याबाबत ३ मे रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्दे‘गोकुळ’चे संचालक मंडळ बरखास्त का करू नये, विभागीय उपनिबंधकांची नोटीस दूध खरेदी दरात कपात केल्याने कारवाई

कोल्हापूर : राज्य सरकारने आदेश देऊनही गाय दूध खरेदी दरात वाढ केली नसल्याने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी ‘गोकुळ’ दूध संघाला नोटीस बजावली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल संचालक मंडळ बरखास्त का करू नये? याबाबत ३ मे रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.शासनाने दि. १९ जून २०१७ रोजी दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ गुणप्रतीसाठी प्रतिलिटर २७ रुपये तर म्हैस ६.० फॅट व ९.० एस. एन. एफ. गुणप्रतीसाठी ३६ रुपये दर व त्यापुढील प्रत्येक पॉँईटसाठी ३० पैसे देण्याचे आदेश दिले.‘गोकुळ’संघाने दि. २१ जूनपासून दरवाढ दिली, पण दीड-दोन महिन्यांनंतर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये कपात केली. याविरोधात आमदार सतेज पाटील यांच्या गटाने संघावर मोर्चा काढून रान पेटविले.

शासन आदेश डावल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दूध संघास नोटीस काढली होती तरीही सरकारच्या आदेशानुसार दूध खरेदी केली जात नसल्याचे निदर्शनास आल्याने संचालक मंडळ बरखास्त का करू नये, अशी नोटीस बजावली असून त्याचा खुलासा नोटीस प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसांच्या अगोदर अथवा बुधवारी (दि. २) पर्यंत सादर करावा.

लेखी खुलासा सादर न केल्यास ३ मे रोजी दुपारी एक वाजता समक्ष स्वत: अथवा व वकिलांमार्फत लेखी वा तोंडी म्हणणे सादर करावे. या मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा खुलासा समाधानकारक नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे शिरापूरकर यांनी नोटिसीत म्हटले आहे.कायदा काय सांगतो....महाराष्ट सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ (३) अ नुसार कारवाई होते. ७९ अ (३) (ब) अन्वये चुकीच्या कामास जबाबदार असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्याचे स्पष्ट आदेश आहेत.अवमान याचिकेसाठी हालचालीदूध दरवाढ आदेश मागे घेण्यासाठी राज्यातील दूध संघांनी सरकारकडे मागणी केली होती. सरकारच्या वतीने दरवाढ मागे घेणार नाही पण कारवाई न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याशिवाय संघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तीन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने सरकारच्या दरवाढी आदेशाला स्थगिती दिली होती तरीही नोटीस काढल्याने सुनील शिरापूरकर यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

गाय दूधाला मागणीच नसल्याने नाईलास्तव खरेदी दर कमी केले. याबाबत सरकारला वस्तुस्थिती पटवून दिली. त्याशिवाय न्यायालयानेही दरवाढ आदेशाला स्थगिती दिली असताना अशा प्रकारची नोटीस कशी काढले जाते, हेच कळत नाही.- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ) 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूधPoliticsराजकारण