शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बॅकफुटवर नाही पण अपेक्षा मात्र वाढल्या : पूनम महाजन यांची कबुली, शिवसेनेबरोबर युतीचे संकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 15:45 IST

केंद्र व राज्य सरकारबध्दल ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पाहता लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे मान्यच परंतू सरकार किंवा पक्ष म्हणूनही आम्ही बॅकफूटवर गेलेलो नाही असे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेबरोबरचे भांडण हे घरातल्या भांडणासारखे आहे, आणि युती दोन्ही बाजूने तोडली गेलेली नाही असे सांगत त्यांनी या पक्षाशी नव्याने युतीचे संकेत दिले.

ठळक मुद्देबॅकफुटवर नाही पण अपेक्षा मात्र वाढल्या : पूनम महाजन यांची कबुलीशिवसेनेबरोबर युतीचे संकेत 

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारबध्दल ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पाहता लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे मान्यच परंतू सरकार किंवा पक्ष म्हणूनही आम्ही बॅकफूटवर गेलेलो नाही असे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेबरोबरचे भांडण हे घरातल्या भांडणासारखे आहे, आणि युती दोन्ही बाजूने तोडली गेलेली नाही असे सांगत त्यांनी या पक्षाशी नव्याने युतीचे संकेत दिले.श्रीमती महाजन यांचा गुरुवारपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु झाला. त्यानिमित्त सकाळी येथे त्यांची जल्लोषात रॅली काढण्यात आली व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदीं पंतप्रधान म्हणून चांगले काम करत असले तरी त्यांच्याकडे चांगली टीम नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केले होते.

त्याबध्दल पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या,‘ पवार म्हणतात तसे कांही नाही. भाजप व सरकारमध्येही उत्तम टीमवर्क आहे.शिवाय आमचा कॅप्टनच इतकी धुवाँधार बॅटींग करत आहे. भारत जेव्हा मॅच जिंकतो तेव्हा विराटच्या खेळाचीच चर्चा होते. त्यामुळे पवार यांनी आमच्या टीमची काळजी करू नये. काँग्रेस आघाडीच्या काळात बरेचसे निर्णय रिमोट कँट्रोलने होत होते.’

त्या म्हणाल्या,‘ पक्ष मोठा व्हायला लागला की खटके उडतात तसेच शिवसेनेसोबत झाले आहे. परंतू तो पक्ष अजूनही सत्तेत आहे. व जरी शिवसेनेने स्वबळावर लढायची घोषणा केली असली तरी हा निर्णय एकाबाजूने झाला आहे. आमचा त्यांच्याशी संवाद सुरु आहे व मला वाटते त्यातून कांहीतरी मार्ग निघेल.

यावेळी आमदार योगेश टिळक, मधुकेश्र्वर देसाई, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, राहूल चिकोडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदिप देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा हेच माझे लक्ष्यमुंबईतून लोकसभा निवडणूक पुन्हा चांगल्या मतांनी कशी निवडून येवू हाच माझा तरी सध्याचा महत्वाचा प्राधान्यक्रम आहे असे त्यांनी स्पष्ट केले. महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्हांला कितपत संधी या प्रश्र्नांवर त्यांनी छे..कांहीतरी काय प्रश्र्न विचारताय असे उत्तर दिले. 

टॅग्स :Poonam Mahajanपूनम महाजनkolhapurकोल्हापूर