शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: हॉटेल्स फुल्ल, जेवणावळी जोरात, यंत्रणा अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:04 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पेटीएमवर पैसे आल्यास ईडीची भीती चक्क मतदारांनाच घातली होती. आता सध्या कोल्हापुरात जे सुरू आहे, त्याची चौकशी कोण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

कोल्हापूर : प्रचारासाठी मुंबईपासून विदर्भापर्यंतचे नेते, कार्यकर्ते कोल्हापुरात आल्याने हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. कार्यकर्त्यांना जेवणाची कुपन्स वाटली जात आहेत. अपार्टमेंट, कॉलन्यांमध्ये जेवणावळी झडत असल्याचे चित्र सध्या कोल्हापुरात दिसत आहे. विशेष म्हणजे याबद्दल निवडणूक यंत्रणा अनभिज्ञ आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पेटीएमवर पैसे आल्यास ईडीची भीती चक्क मतदारांनाच घातली होती. आता सध्या कोल्हापुरात जे सुरू आहे, त्याची चौकशी कोण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्यभरातून माजी मंत्री, आमदार, माजी आमदार, महापौरांसह पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांची फौजच भाजपने कोल्हापुरात आणली आहे. एका नेत्याबरोबर चार-पाच कार्यकर्ते आले आहेत. त्यांची व्यवस्था हॉटेल्समध्ये करण्यात आल्याने हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. प्रत्येकाकडे विशिष्ट जबाबदारी देण्यात आली आहे. दलित मतदार मुख्यत: काँग्रेसच्या पाठीशी असतो म्हणून शहरातील दलित वसाहती, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन केंद्र सरकार व देवेंद्र फडणवीस सरकारने तुमच्यासाठी कशा योजना राबविल्या हे सांगितले जाते. आपण काय केले हे सांगतानाच काँग्रेसने काय केले नाही, हे जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

धार्मिक धुव्रीकरणासाठी सुरुवातीच्या टप्प्यात काश्मीर फाईल्स चित्रपटाची तिकिटे वाटप करण्यात आली होती. आता त्याच यंत्रणेकडून जेवणाची कुपन्स दिली जात आहेत. त्यामुळे मुख्यत: मांसाहारी खाणावळी, हॉटेल्स गर्दीने तुडुंब आहेत. अर्धा-अर्धा तास थांबल्याशिवाय जेवण मिळत नाही, असाही अनुभव येत आहे. निवडणूक विभागाकडे रोज सादर होणाऱ्या खर्चामध्ये हा खर्च मात्र कुठेच येत नाही.

लोकसभा पडली मागे...

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदार संघ आहेत. या दोन्ही मतदार संघाच्या निवडणुकीत जेवढा खर्च झाला नसेल तेवढा खर्च दोन्ही पक्षांकडून या एका जागेच्या पोटनिवडणुकीवर केला जात आहे.

रामनवमीला झेंडे वाटणार

निवडणूक असल्याने रविवारी असलेल्या रामनवमीला यंदा कमालीचे महत्त्व आले आहे. त्या दिवशी जय श्रीराम लिहिलेले झेंडे घरोघरी वाटण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्यासाठी पुण्यातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. कोल्हापुरात रामनवमीनिमित्त अंबाबाई मंदिरात प्रतिवर्षी सायंकाळी पारंपरिक उत्साहात रामाचा रथ काढण्याची प्रथा आहे. परंतु त्याला कधीच अशी हिंदुत्वाची झालर नव्हती. समस्त श्रीराम भक्त कोल्हापूर असे सांगून उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता बिंदू चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ‘रामराज्य आणूया... प्रत्येक घरावर भगवा फडकवू या,’ असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा