शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख कार्यकर्ते? ..तर कोणी भीक घालणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 11:31 IST

दुर्देवाने काही वेगळे घडले तर, आघाडीला मोठी किंमत माेजावी लागेल. एखादी जागा गेली तर त्याचा परिणाम सरकारवर हाेतो. कारभारावरील नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू होते,त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नका असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूर : पाच राज्यातील विजयाने मदमस्त झालेले भाजप एका विधवा भगिनीला हरवण्यासाठी राज्यातील तीन लाख कार्यकर्ते आणणार आहे. हा कोल्हापूर शहराचा अपमान आहे. कोल्हापूरकरांचा इगो दुखावून कोणी मते मागत असेल तर कोणी भीक घालणार नाही. येथे लढाई सुरू आहे काय? एवढेच चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल तर, त्यांनी युक्रेनच्या मदतीसाठी कार्यकर्ते पाठवून द्यावेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.कोल्हापूर उत्तरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले,चंद्रकांत जाधव यांनी अडीच वर्षाच्या काळात कोल्हापूर शहराच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून काम सुरू केले होते. मात्र दुर्देवाने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले, त्याची पूर्तता करण्यासाठी जयश्री जाधव या भगिनी आपल्याकडे ओवाळणी मागायला आल्या आहेत. त्यांच्या पदरात मताची ओवाळणी टाकून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.उमेदवार जयश्री जाधव म्हणाल्या, शिवाजी पेठ आणि स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचे वेगळे नातं होते. गांधी मैदानासह पेठेतील इतर विकासकामांची तळमळ त्यांच्या मनात होती. एक बहीण म्हणून मला मताची ओवाळणी द्या, तुमची ओवाळणी वाया जाऊ देणार नाही. यावेळी विक्रम जरग, अजित राऊत, रविकिरण इंगवले, ॲड. अशोकराव साळोखे, सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. माजी महापौर उदय साळोखे, अजित खराडे, इंद्रजीत बोंद्रे, उत्तम कोराणे, परीक्षित पन्हाळकर, शिवाजीराव जाधव, मंजीत माने आदी उपस्थित होते.

तर आघाडीला किंमत मोजावी लागेल

दुर्देवाने काही वेगळे घडले तर, आघाडीला मोठी किंमत माेजावी लागेल. एखादी जागा गेली तर त्याचा परिणाम सरकारवर हाेतो. कारभारावरील नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू होते,त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नका असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

शिवाजी पेठ एकसंघपणे उभी

शिवाजी पेठ एकसंघपणे जयश्री जाधव यांच्या मागे उभी आहे. त्यामुळे विरोधकांना शिवाजी पेठेत बुथ लावायला कार्यकर्ते मिळणार नसल्याचे अजित राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटील