शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अकृषक, रूपांतरित कर रद्द करा : ‘चेंबर आॅफ कॉमर्स’चे रॅलीद्वारे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 11:00 IST

कोल्हापूर शहरातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांना अकृषक व रूपांतरित कर वसुलीसाठी व दंड आकारणीसाठी पुन्हा एकदा नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. त्या कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचा विरोध असून हे कर रद्द करावेत, अशी मागणी शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देअकृषक, रूपांतरित कर रद्द करा, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचा विरोध शिवाजी चौकातून रॅलीद्वारे निवेदन, नोटिसांची होळी

कोल्हापूर : शहरातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांना अकृषक व रूपांतरित कर वसुलीसाठी व दंड आकारणीसाठी पुन्हा एकदा नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. त्या कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचा विरोध असून हे कर रद्द करावेत, अशी मागणी शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.छत्रपती शिवाजी चौकात सकाळी दहाच्या सुमारास सर्व व्यापारी व उद्योजक जमले. या ठिकाणी अकृषक व रूपांतरित करासंदर्भात पाठविलेल्या नोटिसांची होळी करण्यात आली. यानंतर अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संजय शेटे, चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, उद्योजकांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

शिवाजी चौकातून निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आली. या ठिकाणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, अकृषक व रूपांतरित कराची आकारणी ही अन्यायी आहे. ज्यावेळी महापालिकेचे क्षेत्र निश्चित करण्यात आले, त्यावेळीच हे संपूर्ण क्षेत्र अकृषक किंवा बिगरशेती वापरासाठी आहे, असे घोषित करण्यात आले आहे. ते पुन्हा अकृषक करून घेण्याची काही गरज नव्हती.

महापालिका क्षेत्रात महसूल खात्याने कर आकारणी करणे गैर आहे. या क्षेत्रात जी काही कर आकारणी व्हायची, ती सर्व महापालिका या एकाच यंत्रणेने बसविली आहे. या क्षेत्रातील सर्व जमिनींच्या नोंदी शेती क्षेत्रासाठीची ७ बाय १२ ची पद्धत बदलून सिटी सर्व्हे नंबरप्रमाणे करण्यात आल्या. त्यावेळीही ते क्षेत्र हे बिगरशेती ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा ते बिगरशेती करण्याची सक्ती करणे व त्यावर आकारणी करणे गैर व अन्यायी आहे.यावेळी शिवाजीराव पोवार, हरिभाई पटेल, आनंद माने, प्रदीप कापडिया, प्रवीण शहा, संपत पाटील, कुलदीप गायकवाड, संदीप नष्टे, वैभव सावर्डेकर, नयन प्रसादे, संभाजीराव पोवार, लक्ष्मण पटेल, सनतकुमार कोरडे, अरुण हत्ती, आदी उपस्थित होेते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार