शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महापालिकेच्या दहा शाळा मॉडेल स्कूल बनविणार, शिक्षण समितीच्या अंदाजपत्रकात संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:08 IST

इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळा सुरू करणे, निवडक दहा शाळांना मॉडेल स्कूल बनविणे तसेच सर्व शाळांतून ई-लर्निंगसाठी सर्व सुविधायुक्त प्रोजेक्टर पुरविण्याचा कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचा संकल्प आहे. समितीच्या सभापती वनिता देठे व प्रभारी प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी बुधवारी समितीचे सन २०१७-१८ सालाचे सुधारित व सन २०१८-१९ सालाचे नवीन अंदाजपत्रक कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे यांच्याकडे सादर केले.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेच्या दहा शाळा मॉडेल स्कूल बनविणार शिक्षण समितीच्या अंदाजपत्रकात संकल्प

कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे व प्रभारी प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी बुधवारी समितीचे सन २०१७-१८ सालाचे सुधारित व सन २०१८-१९ सालाचे नवीन अंदाजपत्रक कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे यांच्याकडे सादर केले. इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळा सुरू करणे, निवडक दहा शाळांना मॉडेल स्कूल बनविणे तसेच सर्व शाळांतून ई-लर्निंगसाठी सर्व सुविधायुक्त प्रोजेक्टर पुरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.शिक्षण समितीचे शासन व महापालिकेचा हिस्सा असे एकूण रक्कम रुपये ४७ कोटी ३३ लाखांचे अंदाजपत्रक असून यामध्ये महापालिकेच्या फंडातून रुपये ३१ कोटींच्या अनुदानाची मागणी केली आहे. यातील बहुतांश खर्च हा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगारावर होणार आहे.महापालिकेच्या १३ प्राथमिक शाळांमध्ये सेमी-इंग्रजी वर्ग सुरू असून नवीन तीन सेमी-इंग्रजी प्राथमिक शाळा सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक अर्हताप्राप्त शिक्षकवर्ग तसेच आवश्यक शैक्षणिक साधने, सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची या शैक्षणिक युगात निकड भासत असल्याने १० शाळा मॉडेल स्कूल बनविण्याचा दृष्टिकोनातून आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याकरिता अंदाजपत्रकामध्ये रुपये २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.इयत्ता पहिली व दुसरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा’ सुरू करण्यात आलेली आहे. सदरच्या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येत आहेत. परीक्षेत ९० पेक्षा अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची एप्रिल २०१८ मध्ये अंतिम परीक्षा घेण्यात येणार असून, गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र तसेच पात्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या गुणवत्ता यादीमधील पहिल्या गुणवत्ताधारक पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा रुपये २०० प्रमाणे वार्षिक रुपये २४०० शिष्यवृत्ती, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र तसेच पात्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र