शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

कोल्हापूर : धान्य मार्केट स्थलांतराला नवीन वर्षाचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 2:35 PM

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील धान्य मार्केटमध्ये सर्व सुविधा दिल्या आहेत; पण व्यापाऱ्यांच्या पातळीवर अद्याप काहीच हालचाली दिसत नसल्याने लक्ष्मीपुरीतील धान्य मार्केट स्थलांतरास नवीन वर्षात मुहूर्त लागणार आहे.

ठळक मुद्देधान्य मार्केट स्थलांतराला नवीन वर्षाचा मुहूर्तबाजार समितीने दिल्या सुविधा : आता व्यापाऱ्यांकडून अडले

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील धान्य मार्केटमध्ये सर्व सुविधा दिल्या आहेत; पण व्यापाऱ्यांच्या पातळीवर अद्याप काहीच हालचाली दिसत नसल्याने लक्ष्मीपुरीतील धान्य मार्केट स्थलांतरास नवीन वर्षात मुहूर्त लागणार आहे.टेंबलाईवाडी येथे धान्य मार्केट हलविण्यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षिततेच्या कारणामुळे व्यापारी तिथे जाण्यास टाळाटाळ करत होते; त्यामुळे तिथे व्यापाऱ्यांची गोडावून व बाजार समितीच्या कार्यालयाची दारे-खिडक्याही जाग्यावर राहिल्या नाहीत.

परिणामी, व्यापाऱ्यांनी तिकडे जाण्यास असमर्थता दर्शविली; पण लक्ष्मीपुरीमध्ये धान्याच्या अवजड वाहतुकीने होणाऱ्या कोंडीमुळे पोलीस यंत्रणा त्रस्त झाली आहे. अखेर वाहतूक शाखेने लक्ष्मीपुरीचा धान्य मार्केट टेंबलाईवाडीला हलविण्यासाठी पुढाकार घेतला.

बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन बाजार हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार समितीने टेंबलाईवाडी बाजारात सर्व सुविधा दिलेल्या आहेत. वीज, पाणी, बंदुकधारी सुरक्षारक्षक, पोलीस चौकीसह इतर सुविधा तिथे दिलेल्या आहेत.

डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या सर्व परवानग्या घेऊन स्थलांतरित होण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या; पण अद्याप व्यापाऱ्यांच्या पातळीवर काहीच हालचाली दिसत नाहीत. ३0 व्यापाऱ्यांनी गाळे यापूर्वीच बांधले आहेत. हे व्यापारी १५ दिवसांंत तिथे जातील, उर्वरित त्यानंतर टप्प्याटप्प्याने जाण्याची शक्यता आहे.पोलीस प्रशासनाने आणखी १५ दिवस व्यापाऱ्यांना मुदत दिल्याचे समजते; त्यामुळे धान्य मार्केटचे स्थलांतर नवीन वर्षातच होणार, हे जवळपास निश्चित आहे.

इतर व्यापाऱ्यांचेही स्थलांतर होणारधान्य व्यापारी टेंबलाईवाडीला स्थलांतर झाले, तर यावर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यापारीही आपोआपच स्थलांतरित होणार असल्याने लक्ष्मीपुरीमधील वाहतुकीवरील ताण पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे.

बाजार समितीने सर्व सुविधा दिलेल्या आहेत, आता व्यापाऱ्यांनी तिथे जाण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांची बांधकामे पूर्ण आहेत, त्यांना जाण्यास हरकत नाही. उर्वरित व्यापाऱ्यांनीही लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.- सदानंद कोरगावकर,व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर