शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोल्हापूर :  न्यू गुजरी मित्रमंडळाची लाखाची दहीहंडी, सोमवारी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:31 IST

कोल्हापूर येथील न्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीने सोमवारी (दि. ३) गुजरीचा ‘गोविंदा दहीहंडी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त गुजरी कॉर्नर येथे २५ फूट उंचीची बांधण्यात येणारी दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल.

ठळक मुद्देन्यू गुजरी मित्रमंडळाची लाखाची दहीहंडीसोमवारी कार्यक्रम : नामवंत तारकांची उपस्थिती

कोल्हापूर : येथील न्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीने सोमवारी (दि. ३) गुजरीचा ‘गोविंदा दहीहंडी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त गुजरी कॉर्नर येथे २५ फूट उंचीची बांधण्यात येणारी दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष नगरसेवक किरण नकाते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.गुजरी कॉर्नर येथे दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी आमदार अमल महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, माजी महापौर सुनील कदम, रविकिरण इंगवले, सुहास लटोरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.यंदा दहीहंडी उत्सवात अभिनेत्री इहाना ढिल्लन व संगीतसम्राट प्रथमेश मोरे याचे सॅक्सोफोन वादन हे प्रमुख आकर्षण असणार आहे. तसेच बालकलाकार धनिष्ठा काटकर, प्रांजल पालकर, ऐश्वर्या साळवी, नीलम साळवी, निशा बारोत, तन्वी कोलटे यांचे बहारदार नृत्य सादर होणार आहे.

दहीहंडी उत्सवात वायरिंगमुळे धोका निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अंडरग्राउंड वायरिंगचे काम करण्यात आल्याची माहितीही नकाते यांनी यावेळी दिली. परिषदेस हर्षल कटके, विजय सूर्यवंशी, दीपेश पटेल, संतोष खोगरे, सागर राशिंगकर, सत्यजित सांगावकर, आदी उपस्थित होते.१. भव्य एलईडी स्क्रीन, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, स्टेज स्पेशल इफेक्ट, स्मोक बबल्स, कोल्ड फायर.२. महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.३. करवीर गर्जना ढोल पथकाने कार्यक्रमाची सुरुवात. 

 

टॅग्स :Dhahi Handiदहीहंडीkolhapurकोल्हापूर