शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  सौंदत्ती यात्रेतील अडचणीसंदर्भात बैठक घ्यावी  : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 11:31 IST

सौंदत्ती (कर्नाटक) येथे होणाऱ्या रेणुका यात्रेदरम्यान येणाऱ्या अडचणींसंदर्भात कर्नाटक प्रशासन व संबंधित रेणुका भक्त संघटना यांची व्यापक बैठक घ्यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

ठळक मुद्देसौंदत्ती यात्रेतील अडचणीसंदर्भात बैठक घ्यावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणीकर्नाटक प्रशासन व रेणुका भक्त संघटनांना एकत्र बोलवावे

कोल्हापूर : सौंदत्ती (कर्नाटक) येथे होणाऱ्या रेणुका यात्रेदरम्यान येणाऱ्या अडचणींसंदर्भात कर्नाटक प्रशासन व संबंधित रेणुका भक्त संघटना यांची व्यापक बैठक घ्यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अपर्णा मोरे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातून लाखो भाविक सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी जात असतात. यंदाही २१ डिसेंबरला यात्रा होत आहे.

एस. टी. महामंडळातर्फे प्रतिवर्षी अर्ज, विनंत्या व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केल्यानंतर यात्रेसाठी जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा आकार कमी केला जातो. खोळंबा आकाराचा हा खेळखंडोबा थांबवून कायमस्वरूपी संपूर्ण खोळंबा आकार रद्द करावा. सद्य:स्थितीत सौंदत्ती डोंगर येथे रेणुका मंदिरात चार दरवाज्यांपैकी एका दरवाजाने प्रवेश दिला जातो. यात्रा काळातील गर्दी लक्षात घेता, सर्व दरवाजे खुले करावेत.पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी टॅँकरने मुबलक पाणी पुरवठा करावा. यात्रेला येणाऱ्या अडीअडचणींसंदर्भात स्थानिक प्रशासनाने मोबाईल क्रमांक लोकांना समजतील अशा ठिकाणी लावावेत, रुग्णवाहिकेची सोय करावी, अशा विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासन व कोल्हापूरच्या रेणुका भक्त संघटनांची बैठक जिल्हा प्रशासनाने घ्यावी.शिष्टमंडळात किशोर घाटगे, संभाजी साळुंखे, महेश उरसाल, प्रसाद जाधव, अच्युत साळोखे, मोहन साळोखे, बाबा पार्टे, अशोक जाधव, रेखा दुधाणे, मनोहर सोरप, सुवर्णा पवार, मधुकर नाझरे, सुनील पाटील, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Hindutvaहिंदुत्वkolhapurकोल्हापूर