शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कोल्हापूर : शेतीची पुर्नरचना गरजेची : मुणगेकर, क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:44 IST

सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षणक्षेत्राचेही खासगीकरण सुरु आहे. कायमस्वरुपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. नोटबंदी सारख्या निर्णय, जीएसटीची चांगल्या अमंलबजावणी न केल्याने देशाचा विकास दर खालावला आहे. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मितीसह शेतीची पूर्नरचना करणे गरजे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

ठळक मुद्दे‘देशाची आर्थिक सद्य:स्थिती’ विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यानजेष्ठ स्वातंत्रसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांची ९८ वी जयंतीताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला

कोल्हापूर : सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षणक्षेत्राचेही खासगीकरण सुरु आहे. कायमस्वरुपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. नोटबंदी सारख्या निर्णय, जीएसटीची चांगल्या अमंलबजावणी न केल्याने देशाचा विकास दर खालावला आहे. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मितीसह शेतीची पूर्नरचना करणे गरजे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.डॉ.व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने जेष्ठ स्वातंत्रसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालात ‘देशाची आर्थिक सद्य:स्थिती’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ.पाटील होते.

    ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने जेष्ठ स्वातंत्रसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त प्रथमच क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले. डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी झालेल्या व्याख्यान मालेत विद्यार्थीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : नसीर अत्तार)

    डॉ. मुणगेकर म्हणाले, गेली दहा वर्षाचा विचार करता गेल्या चार वर्षात विकासचा दर कमी झाला आहे. यांचे एक कारण म्हणजे नोटबंदी होय. नोटबंदी मुळे भारतामधील अर्थव्यवस्था सहा ते सात महिने ठप्प झाला.

    काळा पैसा बाहेर काढणे, बनावट नोटाना आळा घालणे आणि अतिरेकीच्या कारवाई रोखणे या उद्देशाने नोट बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र पैकी कोणतेही एकही कारण या निर्णयामुळे साध्य झाले नाही. जी.एस.टी हा सर्वांत चांगला निर्णय आहे. मात्र त्यांची अमंलबजावणी व्यवस्थित केली गेली नाही.गेली तीन - चार वर्षात रोजगाराची चर्चा केली जात नाहा. मोठ्या रोजगारामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते मात्र,रोजगार निर्मिती होत नाही. लहान - लहान उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होती. त्याला उभारी देणे गजेचे आहे. विरोध पक्षांनी सत्ताधार्याच्यावर अंकूश ठेवणे गरजेचे आहे. असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितेल.याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रस्ताविक केले. एस. डी. चव्हाण यांनी आभार तर प्रा. तेजस्विनी मुडेकर स्वागत व सूत्रसंचलन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस.एन. पोवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश हिलगे, उपाध्यक्ष अशोक पर्वते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    गुजरातची कॉलनी बनेल....मुंबई - अहमदाबाद ही बुलेट ट्रेनचे काम सुरु आहे. ही ट्रेन फक्त गुजरात मधील व्यापार्यांच्या सोईसाठी ही जर सुरु झाली तर महाराष्ट्र गुजरातमधील एक कॉलनी होऊन बसेल. या विरोधात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काहीच बोलत नाहीत.

    डॉ. मुणगेकर म्हणाले......

    1. - फळावर प्रक्रिया करणे गरजेचे
    2. शिक्षणाचे खासगीकरण धोकादायक
    3.  कामयस्वरुपी रोजगार हमी पाहिजे
    4.  महिला सक्षमीकरणाकडे लक्ष देणे गरजेचे 

     

    टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक