शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चित्रनगरीकडील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:25 IST

आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना दिलासा देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देचित्रनगरीकडील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची गरजइंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला

कोल्हापूर : आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना दिलासा देण्याची गरज आहे.आर. के.नगरकडून भारती विद्यापीठ आणि के. आय. टी. कॉलेजला जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी या परिसरात ये-जा करीत असतात; तर या बाजूने हायवेलाही जाता येत असल्याने तीदेखील वाहतूक आता वाढली आहे.कंदलगाव कमान ते चित्रनगरीशेजारून जाणारा रस्ता हा एकेरी मार्ग आहे. त्यामुळे समोरून एखादा टेम्पो जरी आला तरी दुचाकी रस्त्यावरून खाली घ्यावी लागते. रस्त्याच्या काटाळ्या भरून न घेतल्याने गाडी खाली घेताना आणि पुन्हा रस्त्यावर आणताना नेहमी या ठिकाणी अपघात होत असतात.येथून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात; त्यामुळे अनेकदा समोरासमोरही अपघातांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळेच या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. यासाठी केवळ पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र हा निधी अपुरा असल्याने या संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण यामधून होणे शक्य नाही.आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुन्हा या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, त्यांचे पालक यांमुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. एका बाजूला चित्रनगरीची भिंत असल्यानेही या कडेने वाहने चालविताना अतिशय दक्षता घ्यावी लागते. यावर उपाय म्हणून विरोधी बाजूचे रुंदीकरण करून भराव टाकून घेण्याची गरज आहे.

पालकांचा जीव टांगणीलारस्त्याची ही अवस्था असल्याने या ठिकाणी कॉलेजला जाणाºया मुलामुलींच्या पालकांचा जीव दिवसभर टांगणीला लागलेला असतो. संध्याकाळी मुले घरी येईपर्यंत पालकांच्या जिवात जीव नसतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने तातडीने निधी वाढवून या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे.

‘केआयटी’कडील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाच लाखचित्रनगरी ते केआयटी कॉलेज या ३०० मीटरच्या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी या रस्त्यावरून गाडी चालविण्यापेक्षा रस्त्याच्या कडेने गाडी चालविणे पसंत करतात. मात्र यंदा जिल्हा परिषदेने यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम याच दोन दिवसांत सुरू होण्याची गरज असून ते दर्जेदार झाल्यास विद्यार्थ्यांसाठी हिताचे ठरणार आहे.

 

शहराबाहेर जाणाऱ्या या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि नागरिकही जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा करीत असलेला वापर यांचा विचार करता या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण आवश्यक आहे. या रस्त्यावरून आमची मुले गाड्या घेऊन जातात. मात्र रस्त्याची अवस्था पाहून त्यांच्या हातात गाडी देण्यासाठीही मन धजावत नाही. रस्ता रुंदीकरण लवकर करणे आवश्यक आहे.विनायक कुलकर्णीपालक

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदroad transportरस्ते वाहतूक