शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कोल्हापूर :  मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 12:26 IST

सदर बझार येथील नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया नराधमास तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सदर बझार येथील ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी रविवारी सायंकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संशयित भूकंप उर्फ बंड्या आनंदा दाभाडे (रा. सदर बझार) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्दे मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक करासदर बझार येथील नागरिकांचा शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा

कोल्हापूर : सदर बझार येथील नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सदर बझार येथील ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संशयित भूकंप उर्फ बंड्या आनंदा दाभाडे (रा. सदर बझार) असे त्याचे नाव आहे.

भूकंप दाभाडे (आरोपी)अधिक माहिती अशी, संशयित भूकंप दाभाडे हा पीडित मुलीच्या शेजारीच राहतो. शनिवारी (दि. १५) सकाळी दहा ते बाराच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना संशयिताने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती पीडितेने आजीला दिली. आजीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित दाभाडे याच्याविरोधात फिर्याद दिली.

मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे सदर बझार परिसरातील नागरिकांतून संतप्त भावना उमटल्या. गुन्हा दाखल होऊन बारा तास उलटले तरी आरोपीला अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ येथील सुमारे ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये महिलांची संख्या जास्त होती. प्रवेशद्वारावरील पोलिसांचे कडे तोडून महिला पोलीस ठाण्यात घुसल्या. त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना ‘आरोपीला अद्याप अटक का झाली नाही?’ असा जाब विचारला.

कोल्हापुरातील सदर बझार येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तत्काळ अटक करा, या मागणीसाठी महिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर काढलेला मोर्चा. (छाया : दीपक जाधव)डॉ. अमृतकर यांनी नागरिकांची समजूत काढत ‘संशयितावर गुन्हा दाखल आहे. पोलीस त्याच्या घरी गेले होते; परंतु तो पसार झाला आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. त्याला अटक करणारच,’ असे सांगितले. त्यावर महिला शांत होऊन माघारी परतल्या.

अचानक महिला पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर आल्यामुळे दाभोळकर कॉर्नर चौकातून व्हीनस कॉर्नर चौकाकडे जाणारी वाहने थांबून राहिल्याने कोंडी झाली. महिला आत घुसल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनीही महिलांना विश्वासात घेत संशयिताला अटक करण्याची ग्वाही दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर