शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आई-वडीलाविना पोरकी ठरलेल्या ‘नकुशी’ला बालकल्याण संकुलच्या ताब्यात देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 12:40 IST

कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील प्रसूती विभागात पोटच्या एक महिन्याच्या बालिके (नकुशी) ला सोडून आईने पलायन केले आहे. तिचा शोध घेतला असता ती मिळालेली नाही. गेली तीन दिवस सीपीआरचे कर्मचारी या बालिकेचा सांभाळ करत आहेत. तिचे वजन कमी असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. प्रकृती सुधारताच तिला बालकल्याण संकुल प्रशासनाच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देआई-वडीलाविना पोरकी वजन कमी असल्याने अतिदक्षता विभागात

कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयातील प्रसूती विभागात पोटच्या एक महिन्याच्या बालिके (नकुशी) ला सोडून आईने पलायन केले आहे. तिचा शोध घेतला असता ती मिळालेली नाही. गेली तीन दिवस सीपीआरचे कर्मचारी या बालिकेचा सांभाळ करत आहेत. तिचे वजन कमी असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. प्रकृती सुधारताच तिला बालकल्याण संकुल प्रशासनाच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ऊसतोड मजूर महिला सोनाबाई रोहिदास गुलाब राठोड (वय २५, रा. तामाने, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) ही २० जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास मावशी अनिता चव्हाणसोबत सीपीआरमधील परिचारिकांना काही न सांगता रुग्णालयात बालिकेला सोडून निघून गेल्या. काही वेळाने हा प्रकार परिचारिकांच्या लक्षात आला. त्यांनी दोन दिवस बालिकेच्या आईची प्रतीक्षा केली; परंतु ती परत फिरकली नाही.

याबाबत समाज सेवा अधीक्षक उज्ज्वला सावंत व सुदर्शन गांगुरडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत वर्दी दिली. पोलीस ‘त्या’ बालिकेच्या निष्ठूर मातेचा शोध घेत आहेत. जन्मत:च बालिकेचे वजन १ किलो २ ग्रॅम आहे. साधारणपणे दीड किलोच्या वरती हवे होते. वजन कमी असल्याने तिची प्रकृती नाजूक आहे. तिच्यावर बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत. ‘त्या’ बालिकेला मातेच्या दुधाची आवश्यकता आहे.

सध्या वरचे दूध तिला दिले जाते. येथील परिचारिका महिला तिचे संगोपन करत आहेत. आई-वडीलाविना पोरकी ठरलेल्या ‘नकुशी’ची अवस्था पाहून डॉक्टरांसह परिचारिकांचे डोळे भरून येत आहेत. तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर बालकल्याण संकुलाशी संपर्क साधून ताब्यात देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्य