शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून दोघा भावांवर खूनी हल्ला, सहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:17 IST

पूर्व वैमन्स्यातून गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यास आलेल्या दोघा भावांवर सहा जणांनी चाकु व काठीने खूनी हल्ला केला. यज्ञेश सुभाष पवार (वय १७, रा. तिनबत्ती चौक, दौलतनगर), त्याचा भाऊ आशिष (२०) अशी जखमींची नावे आहेत. त्यांचेवर सीपआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

ठळक मुद्देपूर्व वैमन्स्यातून दोघा भावांवर खूनी हल्ला सहा जणांवर गुन्हा : अर्धशिवाजी पुतळा येथील घटना

कोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यास आलेल्या दोघा भावांवर सहा जणांनी चाकु व काठीने खूनी हल्ला केला. यज्ञेश सुभाष पवार (वय १७, रा. तिनबत्ती चौक, दौलतनगर), त्याचा भाऊ आशिष (२०) अशी जखमींची नावे आहेत. त्यांचेवर सीपआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना रविवार (दि. २३) दूपारी दोनच्या सुमारास अर्धशिवाजी पुतळा ते गांधी मैदान रोडवर घडली.याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीसांनी संशयित प्रशांत यशवंत मळगेकर, आकाश आनंदा मळगेकर, शुभम गाडीवड्डर, महेश चंद्रकांत हिंडलकोपे, आकाश बिरु ठाकुर, विशाल कुराडे (सर्व रा. दौलतनगर) यांचेवर गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, फिर्यादी आशिष पवार व संशयित दौलनगरमध्ये राहतात. त्यांचेमध्ये पूर्वीपासून वाद आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी एकमेकाकडे बघण्यावरुन वाद झाला होता. याप्रकरणी राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आशिष व त्याचा भाऊ यज्ञेश व संशयित रविवारी दूपारी गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी अर्धशिवाजी पुतळा येथे आले होते.

यावेळी संशयितांनी यज्ञेशला तु सकाळी लय बोलत होतास आता बोल असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी प्रशांत मळगेकर याने कंबरेजवळ ठेवलेला चाकु काढून यज्ञेशच्या कपाळावर, नाकावर वार केले. तसेच आशिषला काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर संशयित तेथून निघून गेले. या दोघां भावांनी सीपीआरमध्ये उपचार घेत पोलीसांत फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर