शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवाने मिळण्याचा मार्ग मोकळा, कोल्हापूर मनपा, प्राधिकरणातर्फे ऑफलाइन परवाने मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 12:51 IST

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : कोल्हापूर , इचलकरंजी महापालिका, नगररचना विभागाची शाखा कार्यालये, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील आणि कोल्हापूर नागरी क्षेत्र ...

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, नगररचना विभागाची शाखा कार्यालये, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील आणि कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणांतर्गत ४२ गावांतील बांधकाम परवाने आणि ले-आउट मंजुरी ऑफलाइन पद्धतीने देण्यास शुक्रवारी शासनाच्या नगरविकास विभागाचे सहसचिव प्रतिभा भदाणे यांनी मान्यता दिली. यामुळे ज्या ठिकाणी ऑनलाइन यंत्रणा आहे, त्या ठिकाणी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी परवाने मिळणार आहेत.कोल्हापूर प्राधिकरणात पाच महिन्यांपासून परवाने बंद असलेल्या प्रश्नांकडे ‘लोकमत’ने सलग दोन दिवस बातमीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याही निदर्शनास हा विषय आणून दिला. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन परवाने देण्यासाठी बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सीस्टिम (बीपीएमएस) संगणक प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत म्हणजे, मार्च २०२३ पर्यत ऑफलाइन परवाने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. येथे याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.

यापूर्वी गेल्या पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेले बांधकाम परवाने, ले-आउट मंजुरीच्या प्रस्ताव निकालात निघणार आहेत. परिणामी, घर बांधू इच्छिणारे आणि बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर आर्किटेक्ट ॲन्ड इंजिनीअर्स असोसिएशननेही लोकप्रतिनिधी व शासनाच्या पातळीवर त्यासाठी पाठपुरावा केला होता, असे असोसिएशनचे पदाधिकारी अजय कोराणे यांनी सांगितले.

प्राधिकरणाच्या हद्दीतील गावांतील बांधकाम परवाने, ले-आउट मंजुरी ऑनलाइनच करावी, असे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने दिले. मात्र, आदेश येऊन पाच महिने झाले, तरी अजून प्राधिकरणाच्या हद्दीतील गावांतील बांधकाम परवाने ऑनलाइन देण्यासाठी आवश्यक बीपीएमएस स्वॉफ्टवेअर कार्यान्वित नाही. ऑनलाइनचा आदेश असल्याने, ऑफलाइन प्रस्ताव स्वीकारणेही बंद केले होते. यामुळे पाच महिन्यांपासून नव्याने बांधकाम परवाने, ले-आउट मंजुरी करणे बंद होते.

यामुळे कोल्हापूर प्राधिकरणासह राज्यातील विविध ठिकाणी कोंडी झाली होती. यामुळे ऑनलाइन यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत ऑफलाइन परवाने द्यावेत, अशी मागणीही अनेक संघटना, व्यक्तींनी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले होते. ‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधल्यानंतर, शासकीय यंत्रणा जागी होऊन ऑफलाइन परवाने देण्यास मुभा मिळाली आहे.

सहा महिन्यांत ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित करून घ्यावीराज्यातील प्राधिकरण, नगररचना शाखा कार्यालयांनी महाआयटी कंपनीकडून तांत्रिक तज्ज्ञ घेऊन ऑनलाइन बांधकाम परवाने देण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करून घ्यावी, असेही नगरविकासच्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सहा महिन्यांपर्यंत ऑफलाइन कार्यवाही होणार असल्याने कोंडी फुटली आहे.

ऑनलाइन यंत्रणा कार्यान्वित होइपर्यंत ऑफलाइन बांधकाम परवाने, ले-आउट मंजुरीस शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे सोमवारपासून ऑफलाइन कार्यवाही सुरू होईल. - संजयकुमार चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर