शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेची कामे पूर्ण करण्यास कोल्हापूर महापालिकेची नकारघंटा

By भारत चव्हाण | Updated: December 23, 2023 12:12 IST

अशी ही कामाची विचित्र पद्धत

भारत चव्हाण कोल्हापूर : अमृत योजनेतून सुरू असलेली पाणीपुरवठा, तसेच ड्रेनेज विभागाची कामे रखडण्यास जसा ठेकेदार जबाबदार आहे, तशी महापालिकेची यंत्रणाही तितकीच जबाबदारी असल्याची बाब समोर आली आहे. आतापर्यंत पालिकेची यंत्रणा ठेकेदाराकडे बोट दाखवून ‘तो’ काम करत नसल्याचा दावा करत होती, पण ठेकेदाराला कामे करण्यास असहकार्य करायचे आणि मुदतही वाढवून देण्यास टाळाटाळ करायची, अशी नकारात्मक घंटा वाजविण्याचे काम पालिकेच्या प्रशासन करत असल्याची टीका होत आहे.कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत २०१७ पासून अमृत योजनेतील कामे सुरू आहेत. शहरात विविध ठिकाणी जलवाहिनी, ड्रेनेज लाइन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे अशी कामे योजनेतून सुरू आहेत. या कामांचा अनुभव फारच वाईट असल्याने त्यावर भरपूर टीका झाली. महापालिका अधिकाऱ्यांनी या अपूर्ण कामाचे खापर ठेकेदाराच्या माथी फोडले. ठेकेदाराचा उद्दामपणा नडत असल्याचा आभास निर्माण केला, परंतु ठेकेदारासह महापालिका यंत्रणाही तितकीच जबाबदार असल्याची बाब समोर येत आहे.याबाबतची माहिती घेतली असता, पालिकेच्या कर्तव्यातील कसुरीही समोर आली. योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यापासून नगरसेवकांचा हस्तक्षेप, कामे करण्यासाठी लागणाऱ्या जागा तत्काळ उपलब्ध करून देण्याबरोबरच आलेल्या अडचणी दूर करण्याची जबाबदारी पालिकेची होती, पण या अडचणी सोडवून काम करण्यास योग्य वातावरण तयार केले नाही. रस्ते खुदाईला, तसेच काही शेतकऱ्यांकडून काम करण्यास विरोध झाला. त्यातही हस्तक्षेप करण्यात आला नाही. पाण्याच्या टाक्या, एसटीपी उभारण्यास जागा उपलब्ध करून दिली नाही.कोरोना, महापूर यांसारख्या अनेक अडचणी समोर असल्याने काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे ठेकेदाराने वेळोवेळी मुदतवाढ मागण्याचा प्रयत्न केला, परंतु पंधरा महिने झाले, तरी मुदतवाढ दिली नाही. मुदत वाढवून दिली नाही म्हटल्यावर ठेकेदाराने काम करण्याचे थांबविले. या काळात त्याची बिले दिली, पण मुदतवाढ दिली नाही.

अशी ही कामाची विचित्र पद्धतड्रेनेजची कामे करण्यास २०१७ पासून दोन वेळा मुदतवाढ दिली. ही मुदत ३०-०९-२०२१ पर्यंत होती. तिसरी मुदतवाढ ३१-१२-२०२२ पर्यंत दिली. त्यानंतर, काम थांबले, मुदतवाढ मागितली, तरीही अद्याप दिलेली नाही. अशीच परिस्थिती पाणीपुरवठ्याबाबतची आहे. २०१८ मध्ये काम सुरू झाले. त्याची मुदत २०२० मध्ये संपली. त्यानंतर, पंधरा महिन्यांनी मुदत वाढवून दिली, तीही दंडाची आकारणी करूनच दिली. मार्च, २०२३ पासून मात्र आजपर्यंत या कामांना मुदतवाढ दिलेली नाही. एकीकडे अडचणी दूर करायच्या नाहीत, कामात विलंब झाल्यानंतर मुदतवाढ द्यायची नाही, यामुळे ठेकेदार काम करायचे की नाही, या संभ्रमात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर