शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची शैक्षणिक गुणवत्ता खड्ड्यात, मनपाला मिळेना पूर्णवेळ शिक्षणाधिकारी; अकरा वर्षांपासून ‘प्रभारीं’कडे कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 13:25 IST

घराघरापर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचविणाऱ्या शाहू महाराजांच्या नगरीची राज्य सरकारच एकप्रकारे गळचेपी करीत असल्याचे उघड

पोपट पवार कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थीच येत नसल्याची ओरड करीत शिक्षकांना दूषणे देणाऱ्या राज्य सरकारला कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीवर गेल्या अकरा वर्षांपासून पूर्णवेळ शिक्षणाधिकारी (प्रशासन अधिकारी) नेमता आलेला नाही. या पदाचा वारंवार दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याकडे प्रभारी कार्यभार देऊन सरकारने येथील शैक्षणिक गुणवत्ता ‘खड्ड्यात’ घातली आहे. देशात पहिल्यांदा मोफत व सक्तीचा शैक्षणिक कायदा करून घराघरापर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचविणाऱ्या शाहू महाराजांच्या नगरीची राज्य सरकारच एकप्रकारे गळचेपी करीत असल्याचे उघड होत आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर व उपनगरात ५८ शाळा असून, येथे १० हजार ७२९ विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिक शिक्षण समितीकडून महापालिका व खासगी शाळांवर नियंत्रण ठेवले जाते. मात्र, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी हे पद गेल्या अकरा वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेसह शैक्षणिक व्यवस्थापन, उपक्रम या विषयाशी निगडित अनेक बाबींवर मर्यादा आल्या आहेत. खासगी शाळांना मान्यता, विद्यार्थ्यांच्या समस्या, शैक्षणिक धोरण हे प्राथमिक शिक्षण विभाग ठरवितो; पण जबाबदार अधिकारी नसल्याने ‘प्रभारीं’च्या माध्यमातूनच हा गाडा हाकला जातोय.

पोतदार शेवटचे पूर्णवेळ प्रशासन अधिकारीमहापालिकेचे ए.आर.पोतदार हे शेवटचे पूर्णवेळ प्रशासन अधिकारी ठरले आहेत. ३ सप्टेंबर २०१२ मध्ये त्यांची इतरत्र बदली झाल्यानंतर एस.ए.गिरी यांच्याकडे या पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला. त्यांनतर बी.डी.किल्लेदार, प्रतीभा सुर्वे, विश्वास सुतार, जे.सी.कुंभार व शंकर यादव यांनी प्रभारी म्हणून काम पाहिले. सध्या शंकर यादव दुसऱ्यांदा प्रभारी प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

विस्तार अधिकाऱ्यांना दिला क्षमतेपक्षा अधिकचा चार्जगेल्या अकरा वर्षांत आठ जणांकडे या पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला. त्यापैकी बहुतांशजण हे तालुक्याच्या ठिकाणी विस्तार अधिकारी होते. वास्तविक महापालिकेचे शिक्षणाधिकारी हे पद वर्ग दोनचे असून, निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या पदाचा कार्यभार देतानाही त्याच्या दर्जाच्या, क्षमतेच्या अधिकाऱ्याकडे त्याचा कारभार द्यायला हवा; परंतु तसे घडलेले नाही.पालकमंत्र्यांकडून अपेक्षाजिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे राज्याचे शिक्षणमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी तरी महापालिकेचे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी पद त्वरित भरावे, अशी मागणी होत आहे.

कोणी ‘लायक’ नाही का?

शिक्षणाधिकारी पद गेली कित्येक वर्षे रिक्त आहे. या पदासाठी कोणी लायक अधिकारी मिळत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत नागरी कृती समितीनेही जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.

शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा करून प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचविले. त्याच शाहूनगरीत महापालिकेला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. राज्य सरकार व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना शाहू महाराजांचे नाव घ्यायचा अधिकार नाही. हे पद रिक्त असल्याने येथील व्यवस्थापन व गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. - अशोक पवार, माजी उपसभापती, प्राथमिक शिक्षण समिती, कोल्हापूर महापालिका.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducationशिक्षण