शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचा धसका, कोल्हापूर महापालिकेने दिवसांत काढल्या २४५ कोटींच्या निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 13:49 IST

विकासकामांना खीळ बसू नये यासाठी धडपड

कोल्हापूर : लोकसभेची निवडणूक केव्हाही लागू शकते, त्यामुळे विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्याची महापालिका प्रशासनाची लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील विविध विकासकामांच्या ९२ कोटी ५१ रुपये खर्चाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर, गुरुवारी एकाच दिवसात पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाने १५३ कोटींच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. आचारसंहितामुळे विकास कामांना खीळ बसू नये एवढ्याच अपेक्षेने या निविदा प्रसिद्ध केल्या जात आहेत.शासनाच्या विविध योजना तसेच जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून विविध विकास कामे करण्याकरिता कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. एरव्ही या निधीतून कामे करण्याची किंवा निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संथ गतीने केली गेली असती. परंतु, लोकसभा निवडणूक आचारसंहिता आता केव्हाही जाहीर होऊ शकते, जर आचारसंहिता लागू झाली तर या कामांना खीळ बसेल म्हणून महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम तसेच पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाने अतिशय झटपट गतीने निविदा प्रक्रिया राबविण्याचा सपाटा लावला आहे.पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाने गुरुवारी रात्री नऊ वाजता चार विकासकामांच्या १५३ कोटींच्या निविदा प्रसिद्ध केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही दिवसांपासून ९२ कोटी ५१ लाखांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. ही सर्व कामे नागरी सुविधांशी संबंधित आहेत. त्यामध्ये दलीत वस्ती सुधार ९ कोटी ५१ लाख, जिल्हास्तर नगरोत्थान १२ कोटी ४४ लाख, ताराराणी मार्केट लक्झरी पार्किंग २ कोटी ५० लाख, गॅस दाहिनी एक कोटी, एनकॅप रस्ते एक कोटी ७० लाख, स्टेशन रोडवरील बहुमजली पार्किंग ४ कोटी ५० लाख, रेल्वे फाटक पादचारी उड्डाणपूल ३ कोटी ८८ लाख, मिनेचर पार्क ३ कोटी ५० लाख, रंकाळा विद्युत रोषणाई ३ कोटी ५० लाख, हेरिटेज पूल रोषणाई २ कोटी ८३ लाख, केएमटीकडील प्रशासकीय इमारत १४ कोटी, सबस्टेशन १७ कोटी, खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातील १७ कोटींचे रस्ते, रंकाळा संध्यामठ व धुण्याची चावी नूतनीकरण १ कोटी ६५ लाख, दिव्यांग भवन १ कोटी ७२ लाख या कामांच्या निविदा प्रसिद्ध केलेल्यांमध्ये समावेश आहे.अंबाबाई मंदिराला मंजूर झालेल्या ४० कोटींच्या निधीची अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे भक्त निवास व विस्तारित पार्किंगच्या निविदा प्रसिद्ध करता आलेल्या नाहीत. या कामांच्या निविदा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरच निघण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध झालेल्या सर्व निविदांची प्रक्रिया वर्कआर्डरपर्यंत नेऊन ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामे निवडणुकीनंतरच सुरू होणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक