Kolhapur Municipal Corporation honors police officers and employees | कोल्हापूर महापालिकेतर्फे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
 कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा सत्कार तत्कलिन महापौर सरीता मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वंदना देठे, उपमहापौर भूपाल शेटे, माधुरील लाड उपस्थित होते.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेतर्फे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारगुणीजणांचेही सत्कार महापौर मोरे यांच्या हस्ते

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर, शशिराज पाटोळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश जाधव, पोलिस हवालदार यामीर शेख, किरण भोगम, नंदकुमार माने यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा  महापौर सरीता मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौर कक्षात हा समारंभ पार पडला.

शिवाजी पार्कमध्ये विद्याभवनच्या पिछाडीस एका अपार्टमेंटची संरक्षक भिंत पडून त्याखाली सहा वषार्चा मुलगा अडकल्याची वर्दी मिळताच महापालिका अग्निशमन विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने दगड मातीचा ढिगारा बाजूला सारून मुलाचे प्राण वाचविले. सदरची कामगिरी पार पाडताना टिमने केलेले अथक प्रयत्न व परीश्रम यामुळेच मुलाचे प्राण वाचले. त्याबद्दल स्थानक अधिकारी कांता बांदेकर, चालक उमेश जगताप, फायरमन केरबा निकम, माणिक कुंभार, गणेश टिपुगडे, आकाश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

याचप्रसंगी कुमार प्रसाद नागेश काळे, बाबासाहेब कासिम मुल्ला, युवा फुटबॉल खेळाडू अबु-सुफियान मंझील मुजावर, आयुष धर्माधिकारी, आयुष वाघमारे, मंदार यशवंत, समर्थ पांढरबळे, श्रेयश पाटील, रिया पाटील, हार्दीक वडार,राहुल खैरे या गुणीजणांचेही सत्कार मोरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपमहापौर भुपाल शेटे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी सभापती शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण सभापती अनुराधा खेडकर, सभागृहनेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेवक ईश्वर परमार उपस्थित होते.

 


Web Title: Kolhapur Municipal Corporation honors police officers and employees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.