शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहराच्या पर्यावरणाकडे कोल्हापूर महापालिकेची आठ वर्षांपासून पाठ

By संदीप आडनाईक | Updated: January 11, 2025 15:55 IST

संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक : मधुकर बाचूळकर

संदीप आडनाईककोल्हापूर : पर्यावरण संरक्षण कायदा आणि मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमांतर्गत दरवर्षी महानगरपालिकेस पर्यावरण स्थिती अहवाल (ईएसआर) प्रकाशित करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. असे असतानाही कोल्हापूर महानगरपालिकेने गेली आठ वर्षे पर्यावरण सद्य:स्थितीचा अहवाल तयारच केलेला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेला पर्यावरणाचे वावडे आहे का ? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींमधून उपस्थित होत आहे.टेरी या संस्थेने कोल्हापूर महानगरपालिकेसाठी २०१६ मध्ये शेवटचा पर्यावरण स्थिती अहवाल तयार केला होता. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या नुकत्याच झालेल्या कोल्हापूर भेटीनंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर भेटीदरम्यान त्यांनी पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती, हे विशेष. संबंधित अहवाल तयार करण्यास आठ वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल म्हणजे काय?शहर पातळीवरील पर्यावरणविषयक समस्या आणि संधी ओळखण्यात मदत करण्यासाठी हा एक सर्वसमावेशक दस्तऐवज मानला जातो. लोकसंख्या, शास्त्रीय, सामाजिक, आर्थिक आणि नागरिकांचे आरोग्य तसेच सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांना ओळखून अशा घटकांच्या निराकरणासाठी पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल महत्त्वाचा असतो. हा अहवाल शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण धोरण तयार करण्यासाठी आणि कृती आराखडा तयार करण्यात आणि अंमलबजावणी करण्यास मदत करतो. ७४व्या घटनादुरुस्ती कायदा १९९२ नुसार पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल तयार करणे अनिवार्य आहे. सी.ए.ए.च्या बाराव्या शेड्युलमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरणीय पैलूंचा प्रचार यांसह अनेक कार्ये समाविष्ट आहेत.माहिती देण्यासाठी लागले आठ दिवसगडहिंग्लज येथील प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींच्या विरोधातील जनहित याचिकाकर्ते श्रीकांत कुंभार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ तपासले असता त्यांना पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल आढळले नाहीत. त्यामुळे त्यांनी २४ डिसेंबर रोजी माहिती अधिकारांतर्गत महानगरपालिकेकडे माहिती मागितली असता आठ दिवस शोधाशोध करून पर्यावरण अधिकाऱ्यांनी ३० डिसेंबरला लेखी पत्राद्वारे अहवाल उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर पर्यावरण अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी ही गंभीर प्रकार उघडकीस आणला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण