शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेतील ड्रेनेज घोटाळा: टक्केवारीचा आरोप असलेले तीन अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:52 IST

प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला

कोल्हापूर : कसबा बावडा ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामात पैसे घेतल्याचा आराेप असलेल्यांवर महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, मंगळवारी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकाउंटंट विभाग प्रमुख तथा सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांना तडकाफडकी निलंबित केले.महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ व वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यास मान्यता देण्यात आली. निवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, निवृत्त उप-शहर अभियंता रमेश कांबळे व पवडी अकाउंटंट निवृत्त कनिष्ठ लिपीक प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशी समितीस ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.शहरातील कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव यांचे घर ते बडबडे मळापर्यंत ड्रेनेज पाइप टाकण्याच्या कामाचे अधिकाऱ्यांनी काम न करता ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांचे ७२ लाखांचे बिल दिल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांनी केला होता. चार दिवसांनी ठेकेदार वराळे याने कनिष्ट अभियंता यांच्यापासून अतिरिक्त आयुक्त यांच्यापर्यंत किती आणि कसे पैसे दिले, याचा आरोप केला होता. या दोन्ही आरोपांमुळे महापालिकेत खळबळ उडाली. त्यातून भ्रष्टाचाऱ्यांची एक साखळी उघड झाली. या घटनेमुळे महापालिकेच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसला.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे. या चौकशी समितीला या सर्व प्रकरणाचा अहवाल सात दिवसांच्या आत देण्याचे निर्देश दिले होते, परंतु मंजूलक्ष्मी यांनी मंगळवारी या चौकशी समितीला ४८ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये जे जे अधिकारी व कर्मचारी कागदपत्राच्या व पुराव्याच्या आधारे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

प्रशासकांचा पहिला दणकाप्रशासक मंजूलक्ष्मी यांनी या भ्रष्टाचाराची गंभीर दखल घेतली आहे. यातून कोणाची सुटका नाही, असा इशारा दिला आहे. मंगळवारी त्यांनी पहिला दणका दिला. प्रथमदर्शनी या प्रकारात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकाउंटंटचे सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांना निलंबित करून घरी घालविले.फिर्यादीच झाल्या निलंबित..ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी या कामासाठी ज्यांनी टक्केवारीने रकमा घेतल्या त्यामध्ये कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांच्याबद्दलही तक्रार केली होती. त्यांना गुगलपे ने ८० हजार पाठविल्याचा स्क्रीन शॉटच त्यांनी माध्यमांना पुरवला होता. गंमत म्हणजे त्याच वराळे याच्याविरोधातील फिर्यादी आहेत. आता त्यांनाच महापालिकेने निलंबित केले, मग पोलिस गायकवाड यांच्याकडून कोणत्या तोंडाने माहिती घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.