शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कोल्हापूर महापालिकेत पूर्णवेळ प्रशासक नसल्याने जनतेची कामे वाऱ्यावर, कामकाज विस्कळीत

By भीमगोंड देसाई | Updated: June 24, 2023 18:42 IST

गलथानपणामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : दोन आठवड्याहून अधिक काळ महापालिकेला पूर्णवेळ प्रशासक नसल्याने महापालिकेत जनतेची कामे वाऱ्यावर आहेत. प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचा धाकच नसल्याने अधिकारी, कर्मचारीही मनमानी पद्धतीने कामकाज करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेच्या चौकात येऊन दोन अधिकाऱ्यांची खुलेआम हुमरी-तुमरी करण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. काही विभागात एजंटगिरी फोफावली आहे. परिणामी महापालिकेस कोणी प्रशासक देता प्रशासक अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शहर आणि जिल्ह्यात अधिकारी म्हणून येण्यासाठी राज्यभरातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असताना प्रशासकपदी कोणी का येत नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची २ जूनला पुण्याला बदली झाली. या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आहे. दरम्यान, डॉ. बलकवडे यांची बदली होऊन २० दिवस उलटले तरी अजूनही प्रशासक म्हणून पूर्णवेळ कोणाचीही बदली झालेली नाही. सध्या हा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे परंतु त्यांना त्यांच्या दैनंदिन व्यापातून या महत्त्वाच्या पदाकडे लक्ष देण्यात वेळ मिळत नाही.शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या या पदावर अधिकारी नसल्याने विकास कामांवरही परिणाम जाणवत आहे. काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे, शहरांतर्गत रस्त्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रंकाळा तलाव परिसराच्या विकासासाठी निधी आला. अशा टप्प्यातच प्रशासक नसल्याने प्रशासकीय वचकच नाहीसा झाला आहे.पाऊस लांबल्याने शहरात पाणी टंचाई गंभीर झाली आहे. कचरा संकलन, प्रक्रियेचे कामही मनमानी सुरू आहे. कधीही टिप्पर चालक काम बंद आंदोलन करीत आहेत. महापालिकेच्या नगररचना, विवाह नोंदणी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. गलथानपणामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे.

कार्यालयीन वेळेआधीच गायबप्रशासक नसल्याने काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेआधीच गायब होत आहेत. अनेक कर्मचारी फिरतीच्या नावावर बाहेरच असतात. नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने अनेक माजी नगरसेवक महापालिकेत ठिय्या मारून कामे करून घेत आहेत.

मोबाईलही उचलत नाहीतमहापालिकेत एका महिला अधिकाऱ्यांकडे महत्त्वाचे विभाग आहेत. त्यांच्या मोबाईलवर माहितीसाठी संपर्क साधल्यानंतर वृत्तपत्र प्रतिनिधींचाही त्या मोबाईल उचलत नाहीत. सामान्यांना तर त्या बेदखल करतात. पूर्णवेळ प्रशासक नसल्याची त्यांची तक्रारही करता येत नाही, अशी स्थिती आहे.

लोकप्रतिनिधी गप्प का ?

विविध प्रश्नांवर संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या शहराला दीर्घकाळ प्रशासक देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी जोर लावला तर एका दिवसात प्रशासक मिळू शकतो. पण ते गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एक कारण असेही...शासनाकडून रस्त्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ती कामे एकाच ठेकेदाराकडे न देता चार टेंडर काढून देण्यात काहींना रस आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच नवीन प्रशासक येईल अशी चर्चा महापालिका चौकात सुरु आहे.प्रमुख कामे रखडली

  • शंभर कोटी रस्त्यांचा ठेकेदार निश्चित करणे.
  • उत्पन्न वाढीसाठी महापालिका गाळे भाडे देण्याची निविदा
  • पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन
  • प्रशासकीय कामकाजाला शिस्त
टॅग्स :kolhapurकोल्हापूर