शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

कोल्हापूर महापालिकेचे १२६१ कोटींचे अंदाजपत्रक, नदी प्रदुषण रोखण्याच्या उपाययोजना भरीव तरतुद 

By भारत चव्हाण | Updated: March 5, 2024 16:40 IST

नागरी सुविधांना प्राधान्य : कचरा उठावासाठी ४० टिपर, ट्रॉली, स्वीपींग मशिन खरेदी

कोल्हापूर : जुन्या योजनांच्या पूर्ततेला प्राधान्य देणारे, नागरिकांच्या सूचनांचा आंतर्भाव असणारे, चांगल्या सुविधा देणारे, शहर स्वच्छतेला प्राधान्य देणारे तसेच महापालिकेच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य देणारे, पंचगंगा नदी प्रदुषण रोखण्यावर भर देणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२४-२०२५ सालाचे नवीन अंदापत्रक मंगळवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केले. या अंदाजपत्रकात घरफाळा, पाणीपट्टीमध्ये कसलीही वाढ करण्यात आली नसली तरी महापालिकेची मैदाने, दुकानगाळ्यांचे हस्तांतर,  फिजिओथेरपी सेंटरच्या शुल्कात किंचित वाढ करण्यात आली आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षित जमा रक्कम ८६८.०६ कोटी असून खर्च ८६७.८४ कोटी अपेक्षित आहे. विशेष प्रकल्पा अंतर्गत जमा ३४६.५१ कोटी अपेक्षित असून खर्च ३४४.३८ कोटी अपेक्षित आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण ४६.५४ कोटी अपेक्षित असून खर्च ४६.०६ कोटी अपेक्षित आहे. तर एकत्रित महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग असे मिळून एकूण १२६१.११ कोटी इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आहे.

सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात राज्य तसेच केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून केल्या जाणाऱ्या विकास कामांची पूर्तता करण्याचा संकल्प नवीन अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. त्यामध्ये महालक्ष्मी विकास आराखडा, रंकाळा तलाव सुशोभिकरण, नगरोत्थानमधील रस्ते, सरस्वती चत्रमंदिर, स्टेशनरोड येथील बहुमजली पार्कींग, अमृत योजना -२ मधील मलनिस्सारण व तलाव संवंर्धन,शाहू समाधीस्थळ विकास, सार्वजनिक शौचायल, पंचगंगा नदी प्रदुषण रोखणे या विकास कामांचा समावेश आहे.

नागरिक व पर्यटकांच्या सोयीसाठी सार्वजनिक टॉयलेट शोध ॲप, सर्व विभागात ऑनलाईन पैसे स्वीकारण्याची सुविधा, एमपीएससी परीक्षार्थींसाठी मुलाखतीचे प्रशिक्षण वर्ग सुरु करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता ४३ एमएलडी पर्यंत वाढविणे, ग्रीनपीस विकसीत करणे, कचरा प्रकल्पावर बफरझोन निर्माण करणे, शहरातील कचरा उचलण्यासाठी ४० ॲटोटिपर रिक्षा, १२ ट्रॅक्टर ट्रॉलीज, बारा स्वीपींग मशिन खरेदी अशा नवीन कामांचा समावेश या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर