शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 16:00 IST

kolhapurnews, muncipaltycarporation, commissioner, transfar, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झालेली आहे. त्या नूतन पोलिस अधिक्षक बलकवडे यांच्या त्या पत्नी आहेत. कलशेट्टी यांच्या बदलीची जागा अद्याप निश्चित झालेली नाही.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली कादंबरी बलकवडे यांची नूतन आयुक्तपदी नियुक्ती

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झालेली आहे. त्या नूतन पोलिस अधिक्षक बलकवडे यांच्या त्या पत्नी आहेत. कलशेट्टी यांच्या बदलीची जागा अद्याप निश्चित झालेली नाही.डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोल्हापूरात स्वच्छता अभियानाला गती दिली. त्यांच्या कामाचा दिवस सकाळी सातला सुरू होतो. कामाची सुरुवात व्हॉटस् अ‍ॅपवरील निरोप पाहण्यापासून होते. खातेप्रमुखांशी फोनवर चर्चा करून कामाच्या सूचना दिल्या जातात. स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी कामाच्या अनुषंगाने बोलणे होतं. महापालिका अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका होतात.कोरोना संसर्गाच्या काळात ते रोज आढावा घेत होते. दिवसभराच्या कामाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणीकडे ते लक्ष देत. दुपारनंतर भाजी मार्केट, आयसोलेशन, क्वारंटाईन इमारतींना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेत. अडीचनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातच डबा मागवून घेऊन जेवण होते. त्यानंतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा व नियोजनाच्या बैठकीला उपस्थिती लावून पुन्हा सोयीने महापालिकेत जाऊन तेथील कामांचा आढावा घेत.लोकप्रतिनिधींना सांभाळत त्यांच्या बैठकांना उपस्थिती लावत त्यांच्या अपेक्षानुसार कामाची पूर्तता करत. संध्याकाळी साडेसहानंतर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठकांना हजेरी असते. दिवसभराचे काम संपवून आयुक्त रात्री दहा वाजता निवासस्थानी जातात. कोविड काळात सलग पंधरा तास कलशेट्टी अव्याहतपणे काम करत होते.शहराचा ध्यास हाच त्यांचा श्वासडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोल्हापूरात आलेल्या महापूरातही मोठे काम केले. पूरग्रस्तांच्या बचावकार्यात त्यांची खूप मोठी भूमिका आहे. पावसाळ्यापूर्वीच त्यांनी नियोजन केले, त्याप्रमाणे त्यांनी काम केले; परंतु नियतीने मोठे आव्हान दिले तेव्हा न डगमगता हा अधिकारी धैर्याने संकटाला सामोरा गेला.

उपलब्ध मनुष्यबळ व साधनांच्या सहाय्याने चार दिवसांत त्यांनी दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले. सकाळी सहा वाजता बाहेर पडणारा हा अधिकारी रात्री उशिरा घरी परतायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे नियोजन करून पहाटे चार वाजल्यापासून सहकारी अधिकाऱ्यांना झोपेतून उठवत असे.देहभान, तहानभूक, कुटुंब सारं काही विसरून जाऊन स्वत:चंच कुटुंब मानलेल्या पूरग्रस्तांना त्यांना आश्वासक आधार दिला. पूर ओसरल्यावरदेखील पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या कामात त्यांनी झोकून दिले आहे. आपली सर्व शक्ती पणाला लावून शासनाकडून अधिकारी आणण्यातदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुराच्या काळात खºया अर्थाने ते देवदूत बनले.

टॅग्स :Transferबदलीcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका