शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून अत्यावश्यक कामातही दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:59 IST

महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातील प्रचंड प्रवाहामुळे सांडपाणी वाहून नेणारी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. पण ही पाईप पूर्ववत जोडण्याच्या कामाला एक महिन्यानंतरही सुरवात झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. पंचगंगा नदी प्रदुषणपश्नी एकीकडे राष्टÑीय हरित लवादाकडून फटके लगावले जात असतानासुध्दा प्रदुषण रोखण्याच्या कामात कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून निष्काळजीपणा दाखविला जात असून ही बाब नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे.

ठळक मुद्देमहिन्यानंतरही पाईप जोडणीच्या कामाला सुरवात नाहीजयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगा थेट नदीत

कोल्हापूर : एक महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातील प्रचंड प्रवाहामुळे सांडपाणी वाहून नेणारी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. पण ही पाईप पूर्ववत जोडण्याच्या कामाला एक महिन्यानंतरही सुरवात झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.

पंचगंगा नदी प्रदुषणपश्नी एकीकडे राष्टÑीय हरित लवादाकडून फटके लगावले जात असतानासुध्दा प्रदुषण रोखण्याच्या कामात प्रशासनाकडून निष्काळजीपणा दाखविला जात असून ही बाब नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे.

शहरातील सर्व भागातील जयंती नाल्यातून वाहून येणारे सांडपाणी दसरा चौक येथील पंप अ‍ॅन्ड संप हाऊस येथे अडविण्यात येते. तेथून ते पाणी उपसा करुन कसबा बावडा येथील सांडपाणी शुध्दीकरण केंद्राकडे पाठविण्यात येते. उपसा केलेले सांडपाणी वाहून नेण्याकरीता संप अ‍ॅन्ड पंप हाऊस येथे पूर्वी २०० अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात आल्या होत्या. परंतू २०१४ मध्ये त्याची क्षमता वाढविण्यात आली. सध्या ४५० अश्वशक्तीच्या ४ मोटारी हे काम करत आहेत.

१३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्याला अक्षरश: उधाण आले होते. त्यावेळी पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने नाल्यातून जाणाºया तीन पाईप पैकी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. चुकीच्या पध्दतीने या पूलाचे डिझाईन केल्यामुळे कधी ना कधी तो कोसळणार याची अधिकाºयांना खात्री होतीच, तो १३ सप्टेंबरच्या पावसात कोसळला.

गेल्या महिन्याभरापासून हा पूल व पाईप कोसळलेल्या अवस्थेतच नाल्यात पडलेला आहे. त्यामुळे नाल्यातील सर्व मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यातून प्रदुषणाचा मात्र वाढत चालला असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.महिन्याभरात फक्त अंदाजपत्रकच

जयंती नाल्यातील मैलामिश्रीत सांडपाणी वाहून नेणारी पाईप पूलासह कोसळल्यानंतर त्याचे दुरुस्तीचे अथवा नवीन पूल बांधून पाईप जोडण्याचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र मनपा प्रशासनाने केवळ नवीन काम करताना कशा प्रकारे करावे आणि त्याला किती खर्च येऊ शकेल याचे अंदाजपत्रक तयार करुन घेतले.

सांगलीच्या वालचंद कॉलेजमधील तज्ज्ञांनी नवीन पूल बांधताना लोखंडी न करता कॉँक्रीटचे पिलर उभे करुन त्यावर ही पाईप जोडावी असा अभिप्राय दिला असून त्यांनी सुचविलेल्या पध्दतीप्रमाणे काम केल्यास त्याला २८ लाख रुपये खर्च येणार आहे.एक महिन्यात काम पूर्ण होणे अशक्य

ड्रेनेज विभागाकडील दुरुस्तीची कामे अत्यावश्यक सेवेत मोडतात. एक जयंती नाल्यात पाईप फुटून एक महिना झाला तरी प्रशासकीय पातळीवर कागदोपत्री कामाच्या जोडण्या करण्यात वेळ घालविला जात आहे. बुधवारी वालचंद्र कॉलेजच्या तज्ज्ञांचा अहवाल महापालिका प्रशासनास मिळाला आहे. त्यांच्या सल्लयाप्रमाणे काम करण्यासाठी आयुक्तांची मान्यता घ्यावी लागणार आहे.

निविदा काढाव्या लागणार आहेत. पंधरा ते वीस दिवसांची निविदा प्रक्रीया राबवावी लागणार आहे. त्यानंतर पुढे महिना ते दीड महिना काम पूर्ण होण्यास लागणार आहे. तोपर्यंत नदीचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरीकांना प्रदुषीत पाणी प्यावे लागणार आहे.२५ ते ३० एमएलडी सांडपाणी नदीत

जयंती नाल्यावरील सांडपाणी अडविण्यासाठी टाकलेल्या सर्व फळ्या काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे नाल्यातील २५ ते ३० एम.एल.डी. मैलामिश्रीत सांडपाणी नदीत मिसळत आहे. तसेच दुधाळी नाल्यातून १८ ते २० एम.एल.डी. सांडपाणी नदीत मिसळते.

मनपा प्रशासनाने कसबा बावडा येथे अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रीया केंद्र उभारले आहे. तेथे फक्त जयंती नाल्यातील पाण्यावरच प्रक्रीया केली जात होती. परंतु आता गेल्या महिन्यापासून जयंती नाल्यातील सांडपाणी बावडा येथील प्रक्रीया कें्रद्राकडे जात नाही. केवळ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे यंत्रणा सक्षम असूनही काम व्यवस्थीत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण ही बाब अतिशय गंभीर आहे.कुठं गेले पर्यावरणवादी?

गेले महिनाभर जयंती नाला थेट पंचगंगा नदीत जाऊन मिळत आहे, त्यामुळे नदी प्रदुषीत होत आहे. परंतु याकडे मनपा अधिकाºयांचे तर लक्ष नाहीत, शिवाय शहरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचेही दुर्लक्ष झालेले आहे. काही कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी पंगा घेण्याचे बंद केले आहे, तर काही जण सोयीची भुमिका घेत आहेत. त्यामुळेच या घटनेचे गांभीर्य कोणालाच राहिलेले नाही. नदीच्या खालच्या बाजूला रहात असलेल्या लोकांना साथीचे आजार उद्भवल्यावरच यंत्रणा जागी होणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.