शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई मार्ग ; विमानसेवेच्या ‘स्लॉट’च्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 10:45 IST

तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरूहोण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उडान योजनेअंतर्गत ट्रू-जेट कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातील तीन दिवस सेवा पुरविली जाणार आहे. मात्र, या कंपनीला मिळालेल्या स्लॉटबाबतची अधिकृत माहिती अद्याप कोल्हापूर विमानतळ व्यवस्थापनाला मिळालेली नाही.

ठळक मुद्देकोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातील तीन दिवस सेवा विमानसेवेच्या ‘स्लॉट’च्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा

कोल्हापूर : तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरूहोण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उडान योजनेअंतर्गत ट्रू-जेट कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातील तीन दिवस सेवा पुरविली जाणार आहे. मात्र, या कंपनीला मिळालेल्या स्लॉटबाबतची अधिकृत माहिती अद्याप कोल्हापूर विमानतळ व्यवस्थापनाला मिळालेली नाही.गेल्यावर्षी उडान योजनेअंतर्गत एअर डेक्कनने कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू केली; मात्र अनियमिततेमुळे ती काही दिवसांतच बंद पडली. त्यामुळे स्लॉटही काढून घेतले. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत कोल्हापूरहून तिरूपती, हैदराबाद आणि बंगलोर या मार्गावर विमानसेवा सुरू झाली. त्याला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

या मार्गावरील सेवांप्रमाणेच मुंबईला सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. लोकप्रतिनिधींसह उद्योजक, व्यावसायिकांच्या संघटनांनी पाठपुरावा केला. त्याची दखल केंद्र सरकारने उडान योजनेअंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावरील निविदा जाहीर केली. त्यात ट्रू- जेट कंपनीने १७ जुलैपासून शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस ही सेवा सुरू होणार आहे. त्याबाबतची माहिती कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. पण, आठवड्यातील या तीन दिवसांच्या स्लॉटबाबतची अधिकृत माहिती विमानतळ व्यवस्थापनाला प्राप्त झालेली नाही.

या अधिकृत माहितीच्या प्रतीक्षेत हे व्यवस्थापन आहे. नव्या मार्गावरील विमानसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी व्यवस्थापनाकडून सध्या सुरूआहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता.

सुविधांची तयारीकोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविणाऱ्याकंपनीसाठी तिकीट काउंटर, प्रवाशांची बैठक व्यवस्था, पार्किंग, लगेज काउंटर, आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी विमानतळ व्यवस्थापनाकडून केली जात आहे. 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर