शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

येत्या रविवारपासून कोल्हापूर-मुंबई रोज विमानसेवा, वेळापत्रक जाणून घ्या

By पोपट केशव पवार | Updated: October 10, 2023 17:47 IST

व्यापारी, कलाकार, खेळाडूंसह प्रवाशांची सोय

कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी येत्या रविवारपासून रोज विमानसेवा सुरु होणार आहे. स्टार एअर कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात येणार असून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठ लाभ होणार आहे. सध्या कोल्हापुरातून मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार हे चार दिवस मुंबईला विमानसेवा सुरु आहे.कोल्हापूर व परिसरातून सध्या कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात रेल्वे, एसटी व खासगी वाहनांना लागणारा वेळ पाहता कोल्हापुरातून रोज मुंबईला विमानसेवा सुरु व्हावी अशी मागणी उद्योजक-व्यापारी वर्गातून होत होती. या अनुषंगाने कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर दैनंदिन विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातील सातही दिवस मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय होणार आहे.बंगळुरु ते मुंबई व्हाया कोल्हापूरही विमानसेवा बंगळुरु ते मुंबई व्हाया कोल्हापूर अशी असेल. बंगळुरुहून सकाळी ९: ०५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरसाठी निघेल. १० : २० मिनिटांनी ते कोल्हापुरात पोहचेल. सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापुरातून हे विमान मुंबईसाठी उड्डाण करेल. मुंबईत ११ : ५० ला पोहचेल. मुंबईतून दुपारी ३ :४० मिनिटांनी हे विमान कोल्हापुरसाठी निघेल. कोल्हापुरात ते ४ : ४० वाजता पोहचेल. ५ : १० मिनिटांनी ते बंगळुरुसाठी रवाना होईल.

कोल्हापुर ते मुंबई ही विमानसेवा येत्या रविवारपासून रोज सुरु होणार आहे. सध्याच्या मुंबईसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच्या विमानसेवेमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. -अनिल शिंदे, संचालक, विमानतळ प्राधिकरण, कोल्हापुर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईairplaneविमान