शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुुंबई विमानसेवा सुरू राहील  : कमलकुमार कटारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:14 IST

कोल्हापूरमध्ये दिवसा विमानांची ये-जा होत असल्याने मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू झाले, तरी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू राहील. या सेवेबाबत अद्याप कोणतीही सूचना कोल्हापूर विमानतळाला प्राप्त झालेली नाही, असे विमानतळ प्राधिकरणाचे कोल्हापुरातील संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापूर-मुुंबई विमानसेवा सुरू राहील  : कमलकुमार कटारियानाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दिवसा विमानांची ये-जा होत असल्याने मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू झाले, तरी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू राहील. या सेवेबाबत अद्याप कोणतीही सूचना कोल्हापूर विमानतळाला प्राप्त झालेली नाही, असे विमानतळ प्राधिकरणाचे कोल्हापुरातील संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले.हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर आणि हैदराबाद-कोल्हापूर-तिरूपती या मार्गावर सुरू असलेल्या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत या दोन्ही मार्गांवर विमानसेवा सुरू आहे. त्यात राज्यात शिर्डीपाठोपाठ कोल्हापूरच्या विमानतळाने प्रवासी आणि सेवा देण्याबाबत चांगली भरारी घेतली आहे.

ते लक्षात घेऊन आणि कोल्हापूरमधून दिवसा विमानांची ये-जा होत असल्याने मुंबई-कोल्हापूर विमानसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू झाले, तरी कोल्हापूरमधून सेवा सुरू राहील, अशी आशा आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या सूचनेनुसार याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, असे कटारिया यांनी सांगितले.

नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यातकोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या दोन्ही बाजूंच्या जमिनीचे सपाटीकरण, आॅब्स्टॅकल लाईटच्या सुविधेचे बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर परवान्यासाठी प्रस्ताव ‘डीजीसीए’कडे पाठविण्यात येणार आहे. नाईट लँडिंग सुविधा विमानसेवा आणि विमानतळाच्या विकासाला बळ देणारी आहे. या सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे कटारिया यांनी सांगितले. 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर