शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 17:38 IST

मराठी चित्रपटसृष्टीची जननी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या परंपरेत मोलाची कामगिरी बजावलेल्या कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा करत सोमवारी चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याला सोमवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीसह, ‘सैरंध्री’, ‘अयोध्येचा राजा’ चित्रपटातील प्रसंग चित्ररथातून साकारण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजराशोभायात्रेतून दिला योगदानाला उजाळा

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची जननी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या परंपरेत मोलाची कामगिरी बजावलेल्या कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा करत सोमवारी चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याला सोमवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीसह, ‘सैरंध्री’, ‘अयोध्येचा राजा’ चित्रपटातील प्रसंग चित्ररथातून साकारण्यात आले.खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार, राजकपूरला पहिला मेकअप, पहिले पोस्टस पेंटिंग असे सगळे पहिले वहिले घडले ते या कलानगरीत.

मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीलाही नियमांत अधीन राहून काम करायला शिकविले ते येथील चित्रतपस्वींनी. या मातीने रसिकांना उत्तमोत्तम चित्रपट तर दिलेच शिवाय लेखकांपासून ते दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ अशी फळीच तयार केली. आजही ही परंपरा व वारसा चालवण्याचा प्रयत्न येथील सिनेव्यावसायिक करत आहेत. या सगळ्या देदीप्यमान इतिहासाला शोभायात्रेतून अभिवादन करण्यात आले.लावणी नृत्याविष्कारासह झांजपथक, हलगी-घुमक्यासह शिवकालीन युद्धकलांची थरारक प्रात्यक्षिके, पारंपरिक लवाजमा हे शोभायात्रेचे खास आकर्षण राहिले. कोल्हापूर चित्रनगरीच्या चित्ररथासह जुने दुर्मीळ कॅमेरेही लक्ष वेधून घेत होते. महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी पुतळा, बिंदू चौक मार्गे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शोभायात्रा विसर्जित झाली. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर