शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, दिव्यांग सेनेचे साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 18:47 IST

कोल्हापूर महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात, यासह दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्याच्या निषेधार्थ दिव्यांग सेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. तसेच व्हन्नूर (ता. कागल) येथील हजारे कुटुंबीयांनीही उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देदिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनदिव्यांग सेनेचे साखळी उपोषण

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात, यासह दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्याच्या निषेधार्थ दिव्यांग सेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. तसेच व्हन्नूर (ता. कागल) येथील हजारे कुटुंबीयांनीही उपोषण सुरू केले आहे.जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोल्हापूर महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात, या खेळाडंूना सोई, सवलती देण्यासाठी स्वतंत्र क्रीडा विभाग असावा. जिल्हा परिषद अंतर्गत समाजकल्याण कार्यालयामध्ये फक्त त्या विभागाशी संबंधित कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावेत.

शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायती ५० टक्के घरफाळा करामध्ये सवलत दिली जाते. त्याचप्रमाणे मनपा, नगरपालिका अंतर्गत दिव्यांगांना कुटुंब प्रमुखाची अट न लावता सवलत मिळावी. ‘सीपीआर’मध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करावी.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नारायण मडके, उत्तम चौगले, संतोष फडतारे, शोभा चौगले, कमल कोरे, सुनील कोरे, विद्या सुतार, गोरखनाथ कांबळे, आदी सहभागी झाले आहेत. दरम्यान, दिव्यांग आणि गतिमंदांची नोकरभरती करावी, या मागणीसाठी शेखर वडणगेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

व्हन्नूर येथील हजारे दाम्पत्याचे उपोषणशासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवत असल्याच्या निषेधार्थ व्हन्नूर (ता. कागल) येथील सरला हजारे यांनी पती शिवाजी हजारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर