शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Kasturi Savekar: कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केलं एव्हरेस्ट शिखर, शाहू महाराजांना यश समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:39 IST

कस्तुरीने मागील वर्षी मे महिन्यातच माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र, तिला वादळी वारे आणि खराब हवामानामुळे अखेरच्या टप्प्यावरून शिखर सर करता आले नव्हते.

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गिर्यारोहक कस्तुरी दिपक सावेकर हिने आज, शनिवारी सकाळी सहा वाजता जगातील सर्वात उंच समजले जाणारे ८ हजार ८४८. ८६ मीटर उंचीचे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करीत देशाचा तिरंगा फडकाविला. हे यश तिने राजर्षी शाहू महाराजांना समर्पित केले.कस्तुरीने मागील वर्षी मे महिन्यातच माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र, तिला वादळी वारे आणि खराब हवामानामुळे अखेरच्या टप्प्यावरून शिखर सर करता आले नव्हते. त्यामुळे ही मोहीम तिला अर्धवट सोडावी लागली होती. मात्र तिने हताश न होता आपले प्रयत्न सुरु ठेवले. नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावर तिने अनेक शिखरे पादाक्रांत केली...अन् पुन्हा चढाईसाठी रवानामागील वर्षी माऊंट एव्हरेस्ट चढण्यास अपयश आल्यानंतर कस्तुरी पुन्हा २४ मार्च २०२२ ला एव्हरेस्ट चढाईसाठी रवाना झाली. या मोहिमेचा एक भाग म्हणून सरावादरम्यान २८ एप्रिल २०२२ दरम्यान अष्टहजारी समजले जाणारे अन्नपुर्णा-१ हे २६ हजार ५४५ फुटावरील अंत्यत खडतर समजले जाणारे हेशिखर तिने सर केले. हे शिखर सर करणारी ती कमी वयात सर करणारी जगातील सर्वात तरूण गिर्यारोहक ठरली.एव्हरेस्ट सर करणारी कोल्हापूरची पहिली कन्याकस्तुरीने यापुर्वी माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या टप्प्यावर हवामान बिघडल्यामुळे नाईलाजावास्तव तिला माघारी फिरावे लागले. परंतु तिने हताश न होता. पुन्हा दुप्पट जोमाने सरावास सुरुवात केली. तिने २४ मार्च ला पुन्हा बेस कॅम्प गाठला. आज, शनिवारी सकाळी सहा वाजता माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करीत यश खेचून आणले. अशी कामगिरी करणारी ती पहिली कोल्हापूकर ठरली.एव्हरेस्टकडे कुचया मोहमेनंतर ती बुधवारी (दि.४ मे) ती एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहचली. सर्व सज्जता करून तीने सोमवारी (दि.९) मे रोजी रात्री नऊ वाजता चढाईला सुरुवात केली. मंगळवारी (दि.१०) दुपारी दोन वाजता कॅम्प दोनवर पोहचली. तेथे दोन दिवस तेथेच मुक्काम केला. त्यानंतर गुरुवारी (दि.१२) तारखेला तिने कॅम्प ३ गाठला. तेथून शुक्रवारी (दि.१३) दुपारी कॅम्प ४ ला पोहचली. तिथे थोडी विश्रांती घेऊन रात्री सात वाजता तिने अंतिम समिट पुशला सुरुवात केली. पुर्ण रात्रभर चालून तिने सकाळी ६ वाजता जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेसटवर भारतीय तिरंगा व करवीर नगरीचा भगवा फडकावला. अशी माहिती वडील दिपक सावेकर यांनी दिली.

अन्नपुर्णा-१ आणि माऊंट एव्हरेस्ट ही दोन्ही स्वप्नवत ठरणारी शिखरे सर केली. हे यश मी लोकराजा राजर्षी शाहू स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराजांना सर्मपित करीत आहे. या यशात आई वडील, अरविंद कुलकर्णी, संतोष कांबळे, सिद्धार्थ पंडित, इंद्रजित सावेकर, विजय मोरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला मदत करणाऱ्या सर्वाचाच सिंहाचा वाटा आहे. - कस्तुरी सावेकर, एव्हरेस्टवीर गिर्यारोहक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEverestएव्हरेस्ट