शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘मातोश्री’ला ‘निखळ मैत्री’चा आधार, वृद्धांच्या मदतीसाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:08 IST

निराधार आजी-आजोबांना सांभाळणाऱ्या चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ‘निखळ मैत्री परिवार’ या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सोमवारी ‘इंद्रधनु’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

ठळक मुद्दे ‘मातोश्री’ला ‘निखळ मैत्री’चा आधारवृद्धांच्या मदतीसाठी पुढाकार; सामाजिक बांधीलकीचे पाऊल

कोल्हापूर : निराधार आजी-आजोबांना सांभाळणाऱ्या चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ‘निखळ मैत्री परिवार’ या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सोमवारी ‘इंद्रधनु’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या सिद्धाई महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर उपस्थित असतील.

लोकमत’ने गुरुवार (दि. ४)च्या अंकात ‘मातोश्री वृद्धाश्रमाला हवाय मदतीचा हात’ हे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत ‘निख्खळ मैत्री परिवार’ने या वृद्धाश्रमाला मदतीचा हात दिला आहे. त्यासाठी वृद्धाश्रमाची ओळख करून देणारी आणि मदतीचे आवाहन करणारी विशेष चित्रफीत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.या ग्रुपमध्ये ६० हून अधिक सदस्य असून ते विविध सामाजिक संस्थांना अर्थसाहाय्य करतात. दोन महिन्यांपूर्वीही त्यांनी ‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वयम् विशेष मुलांच्या शाळेला अर्थसाहाय्य केले. त्यासाठी विशेष चित्रफीत तयार करून सोशल मीडियावर टाकली होती.

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे, तर मुंबईसारख्या शहरातूनहीअनेक व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला. तरी समाजातील दानशूर संस्था, व्यक्तींनी मदत देण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने आमचा ग्रुप कार्यरत आहे. समाजातील दानशूरांच्या मदतीचा हात सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचावा, ही त्यामागची तळमळ आहे. या उपक्रमातून एक वेगळे समाधान आम्हा सर्वांना मिळते.- सरदार पाटील, सदस्य, निखळ मैत्री परिवार. 

 

टॅग्स :Lokmatलोकमतkolhapurकोल्हापूर